मंगळवार, ५ एप्रिल, २०१६

Coffee......??

तू समोर अशी माझ्या
मला वेडी करता-करता
क्षण सारे थांबून गेले
एकटक तुला बघता-बघता

काय सांगू अदा तुझी
कवितेत कशी मांडू ?
नम्र तुझे रूप सोनेरी
शब्दात कसे बांधू ?

काहीच न्हवते सुचत मला
समोर तुझ्या बसता-बसता
मग क्षण थांबून गेले
एकटक तुला बघता-बघता…….।।१।।

अश्या वेळी दोघांमध्ये
coffee ची जोडी बसली होती
हरवून गारवा स्वताची
ती एकमेकात रमली होती

त्यांना सुद्धा प्रेम जडले
तुझ्या माझ्यात झुलता-झुलता
क्षण सारे थांबून गेले
एकटक तुला बघता-बघता……।।२।।

वाटलं मग जग सारं
इथंच थांबून बसावं
तुझ्या सोबत coffee पीत
कायम असंच जगावं

अशीच वेळ निघून गेली
एक एक घोट घेता-घेता
क्षण मात्र  थांबून गेले
एकटक तुला बघता-बघता….।।३।।

अजून सुद्धा जिभेवरती
coffee तिचं घुटमळते
आठवण काढून तुझी मग
माझे मन तळमळते

पुन्हा भेटू नव्याने ग
coffee नवीन पिण्याकरिता
क्षण पुन्हा थांबून जातील
एकटक तुला बघता-बघता…… ।।४।।

क्षण पुन्हा थांबून जातील
एकटक तुला बघता-बघता……


-प्रशांत भोपळे
(Date: ०५/०४/२०१६)  


Tag: Love| Passion |Marathi | Poem | Kavita | Romantic

ते मोजके क्षण

       मोजके क्षण तुझ्यासवे
       माझे भान हरपून गेले
       तुझ्यामधले काही दुवे
       माझ्यामध्ये सोडून गेले

तू फुलपांखरू अल्लड वेडी
तू नाजूक नम्र कळी
पहिल्या पावसाच्या चाहूल होता
स्वछंद नाचणारी मोर परी

       तुझ्या हास्यामध्ये सखे
       माझे मन विरून गेले
       तुझ्यामधले काही दुवे
       मग माझ्यामध्ये राहून गेले…. ।।१।।

बोलका तुझा चेहरा
अन अबोल गाली खळी
चश्यामागून चोरून पाहती
हिरवा चाफा एक कळी

       त्या कळीची बेधुंद हास्य
       खळीत मला बुडवून गेले
       तुझ्यामधले काही दुवे
       मग माझ्याजवळ सोडून गेले …. ।।२।।

मोजकेच क्षण होते पदरी
मला तेव्हा जगण्याकरिता
तुझ्या नयनी वेड्या सारखे
बुडून मग वाहण्याकरिता

       तू निघून जातो म्हणता
       क्षण तसेच गोठून गेले
       तुझ्यामधले काही दुवे
       माझ्यामध्ये सोडून गेले…।।३।।

थांबवून तुला घ्यावे
असा विचार मनात आला
तोडून सारे बंधन हा
मन वेडा झाला

       पण वेळ संपली आता
       घड्याळ माझे सांगून गेले
       तुझ्यामधले काही दुवे
       मग माझ्यामध्येच राहून गेले…।।४।।

तुझ्यामधले काही दुवे
मग माझ्यामध्येच राहून गेले…


-प्रशांत भोपळे
(Date: ०५/०४/२०१६)

Tag: Marathi | Love |Passion |Poem |Romantic