शुक्रवार, २७ नोव्हेंबर, २०१५

मला पाऊस आवडत नाही

मला पाऊस आवडत नाही
कारण तिची आठवण येते
ओल्याचिंब सरीमध्ये
भिजून समोर उभी होते........।।

तिचा बालिश वागणं
अन तिची चंचल अदा
या पावसातच झालो होतो
तिच्यावरती फिदा
       नक्कल करून तिची
       त्या पावसाला पण मज्जा येते
       म्हणून पाऊस आवडत नाही
       कारण तिची आठवण येते ..........।।१।।

पहिली भेट पावसातली
ती विजेसारखी चमकली होती
धुंद सुसाट वाऱ्यासारखी
मनामध्ये भिणली होती
       त्या बेधुंद क्षणांची
       पुन्हा जाणीव देवून जाते
       म्हणून पाऊस आवडत नाही
       कारण तिची आठवण येते ..........।।२।।

माझ्या मधल्या चातकाला ती
पावसारखी वाटायची
तिची भेट सकाळी होईल
म्हणून रात्र जागायची
       ओल्या चिंब पावसासारखी
       भिजून मग ती भेटायला येते
       म्हणून पाऊस आवडत नाही
       कारण तिची आठवण येते ..........।।३।।

-प्रशांत भोपळे
(Date:२१/११/२०१५)

Tag:Romantic | Marathi | Poem | Love | Passion | Kavita

सोमवार, २३ नोव्हेंबर, २०१५

चल चले उस जगः

 चल चले उस जगः
 कोई नही हो अपने सिवा….।।

मै हात तेरा थामू
बस साथ तेरा मांगू
तू शर्माते हुवे निकले
जब दीदार तेरा मांगू
       मेरे आंखोमें खुदको देख
       तू सिमट जाये कली की तरः
       चल चले उस जगः
       कोई नही हो अपने सिवा…. ।।१।।

तेरे हातो पे नाम मेरा
जब उन्ग्लीयो लिखू मै
तू थरथराये किसी पत्तोन की तरः
तुटके मुझमें बिखरनेको
        उन पत्तोन की सरसराहत
        मन मे मेरे बिजली की तरः
        चल चले उस जगः
        कोई नही हो अपने सिवा…….।।२।।

फ़िर धिमी आवाज में मै पूछूंगा
इझहारे मोहब्बत करदो
बस्स तेरी झुकी पलके
सब बयाँ कर देंगी
        फ़िर कोई आवाज ना हो
        अपने धडकनों कें सिवा
        चल चले उस जगः
        कोई नही हो अपने सिवा…….।।३।।

चल चले उस जगः
कोई नही हो अपने सिवा…….

-प्रशांत भोपळे
(Date:२३/११/२०१५)
  

मंगळवार, १७ नोव्हेंबर, २०१५

पसारा

थोडसं तू येवून जा
भेट एक देवून जा
माझ्या मनातला पसारा सखे
थोडासा तू आवरून जा……।।

पसाऱ्यामध्ये सखे
आठवणींची खेळणी आहेत
दोघांनी खेळेलेले
खेळ थोडे जुने आहेत
       त्या खेळण्यांवरची सखे
       धूळ थोडी झाडून जा
       माझ्या मनातला पसारा सखे
       थोडासा तू आवरून जा……।।१।।

पसाऱ्यामध्ये  कोनाड्यात त्या
वह्यामध्ये आहे दर्पण
ज्यात लिहिले होते आपल्या
प्रत्तेक भेटीचे नाजूक वर्णन
       निखळलेली काही पाने
       पुन्हा वहीत जोडून जा
       माझ्या मनातला पसारा सखे
       थोडासा तू आवरून जा……।।२।।

भिंतीलगत पडला तसाच
छोटा एक पिटारा आहे
तुझ्या माझ्या गुपितांचे
त्यामध्ये पसारा आहे
       लपवून सारी गुपितं तू
       कुलूप त्याला घालून जा
       माझ्या मनातला पसारा सखे
       थोडासा तू आवरून जा……।।३।।

बघ साऱ्या मनामध्ये
भावनांच्या घड्या विस्कटलेल्या
इथल्या तिथल्या साऱ्या जागा
भावनांनी या भरलेल्या
       सावरून साऱ्या भावनांना तू
       थोडे मोकळे करून जा
       माझ्या मनातला पसारा सखे
       थोडासा तू आवरून जा……।।४।।

-प्रशांत भोपळे
(Date:१७/११/२०१५)


Tag: Romantic Marathi Poem | Kavita | Love | Passion | Radha Krishna |

गुरुवार, ५ नोव्हेंबर, २०१५

बघ प्रेम करून

आभाळ भरल्या ढगासंग
पाऊस बनण काय असतं
प्रेम करून बघ कळेल
प्रेम म्हणजे काय असतं

एकांतात प्रेमच्या
तारे मोजणं काय असतं
आठवण काढून कुणाची तर
चांदण्यात भिजण काय असतं
       बघ प्रेम करून कळेल
       प्रेम म्हणजे काय असतं......।।१।।

आठवण काढून त्या क्षणांची
आरशात बघण काय असतं
अन आपल्याच डोळ्यामध्ये कधी
दुसऱ्याला बघणं काय असतं
       बघ प्रेम करून कळेल
       प्रेम म्हणजे काय असतं......।।२।।

जळणाऱ्या ज्योती वर
पाखरू बनण काय असतं
अन प्रेमापायी तिच्या
जळून मरणं काय असतं
       बघ प्रेम करून कळेल
       प्रेम म्हणजे काय असतं......।।३।।

प्रेम करत राहण्यासाठी
जगाशी लढणं काय असतं
उधाणलेल्या सागरामध्ये
होडी बनून खेळणं काय असतं
       बघ प्रेम करून कळेल
       प्रेम म्हणजे काय असतं......।।४।।


-प्रशांत भोपळे
(Date:५/११/२०१५)



Tag: Romantic Marathi Poem | Kavita | Love | Passion | Radha Krishna |

वाटाड्या

प्रितीच्या या डोहामध्ये
खळ-खळ वाहत होतो
झरा बनून तुझ्या प्रितीचा
तुझ्यापर्यंत होतो

तू होतीस प्रेमाची
वेगळीच एक छाया
तू होतीस जीवनाची
वेगळीच एक माया
       प्रवास होता जीवनाचा
       मी प्रवास पूर्ण जगलो
       बनून वाटाड्या तुझ्यासाठी
       तुझ्यापुरताच उरलो…

तू होतीस डोळ्यामध्ये
साठवलेली धारा
तू होतीस कल्पनेचा
वेगळाच एक वारा
       धारेमध्ये वाऱ्यासंगे
       सत्व विसरून वाहिलो
       बनून वाटाड्या तुझ्यासाठी
       तुझ्यापुरताच राहीलो…

पण प्रवास आला संपत
आता समुद्र समोर आहे
प्रितीच्या या डोहाचे
अस्थित्व संपत आहे
       बनून प्रशांत सागर मी
       सामावून आज गेलो
        बनून वाटाड्या तुझ्यासाठी
       तुझ्यापुरताच राहीलो…


-प्रशांत भोपळे
(Date:४/११/२०१५)



Tag: Romantic Marathi Poem | Kavita | Love | Passion | Radha Krishna |

काटा

नजर तुझी झुकलेली
आभाळागत दिसते गं
आठवण पहिल्या प्रेमाची
काटा मनास रुतते गं…।।

कंठ दाटून आला तुझा
डोळे सुद्धा पाणावले
जेव्हा इतक्या दिवसांनी तू
अवचीत मला पाहीले
       शांत तुझं राहणं पण
       खूप बोलून गेलं गं
       आठवण पहिल्या प्रेमाची
       काटा मनास रुते गं…।।१।।

आठवण जुन्या वेळेची मग
मनात साठवू लागलीस
निरनिराळे क्षण जुने तू
उगाच आठवू लागलीस
       त्या क्षणात आपले जग
       जगापासून वेगळे गं
       आठवण पहिल्या प्रेमाची
       काटा मनास रुततो गं…।।२।।

पण नातं आज आपलं
सुकलेल्या नदीसारखं
तहानलेल्या कृष्णाने या
काठावरती बसल्या सारखं
       जाणीव जेव्हा संपल्याची
       उरलो आपण एकटे गं
       आठवण पहिल्या प्रेमाची
       काटा मनास रुततो गं…।।३।।

आठवण पहिल्या प्रेमाची
काटा मनास रुततो गं…


-प्रशांत भोपळे
(Date:३/११/२०१५)



Tag: Romantic Marathi Poem | Kavita | Love | Passion | Radha Krishna |

प्रेमाची भाषा

नजरेत नजर देऊन तुझं
तू हळूच नजर चोरायची
प्रेमाची ही भाषा मला
कधीच नाही कळायची…।।

पाहून मला तुझं
उगाच गाली हसणं
चालत पुढे जाता जाता
माग वळून बघणं
       त्या वळून बघण्यामध्ये
       वेगळीच अदा असायची
       प्रेमाची ती भाषा मला
       कधीच नाही कळायची…।।१।।

माझ्यासाठी रोज तुझं
वाट माझी बघणं
कितीही उशीर झाला तरी
कधीच नाही चिडणं
       तुझ्या वाट बघण्यामध्ये
       वेगळीच नशा असायची
       प्रेमाची ही भाषा मला
       कधीच नाही कळायची…।।२।।

हात पुढे करता मी
हाती हात धरायची
विनाकारण कधी कधी
मुठ तू अवळायची
       तुझ्या हाती हात असता
       वेगळीच उब भासायची
       प्रेमाची ही भाषा मला
       कधीच नाही कळायची…।।३।।

घराकडे जाता जेव्हा
वाट परतीची लागायची
"नको ना जावू " अशी
हाक मनातून निघायची
       माझ्या मनाची बैचेनी मग
       मलाच नाही कळायची
       प्रेमाची ही भाषा मला
       कधीच नाही कळायची…।।४।।

प्रेमाची ही भाषा मला
कधीच नाही कळायची…


-प्रशांत भोपळे
(Date:२/११/२०१५)


Tag: Romantic Marathi Poem | Kavita | Love | Passion | Radha Krishna |

पुन्हा एकदा

एकदा तुला पहावस वाटतं
पुन्हा तुला भेटवसं वाटत
तुझ्या डोळ्यांच्या पापण्यांमध्ये
स्वप्न बनून खेळावासं वाटतं …।।

शेवटची भेट आपली
अर्धवट राहिली होती
भातुकलीच्या खेळासारखी
मोडून मधेच गेली होती
       त्या खेळाचा डाव पुन्हा
       तुझ्या हाती दयावसं वाटतं
       अन तुझ्या डोळ्यांच्या पापण्यांमध्ये
       स्वप्न बनून खेळावासं वाटतं …।।१।।

पुन्हा एकदा नयनी तुझ्या
चिंब होवून भिजावंसं वाटतं
पुन्हा तुझ्या केसांखाली
रात्र होवून निजावंसं वाटतं
       त्या केसांच्या बटेमध्ये
       पुन्हा पुन्हा गुंतावसं वाटतं
       अन तुझ्या डोळ्यांच्या पापण्यांमध्ये
       स्वप्न बनून निजावंसं वाटतं …।।२।।

आठवतं अजून सुद्धा
जेव्हा आपण भेटायचो
वेडावलेल्या मुलांसारख
एकमेकांशी खेळायचो
       पुन्हा तसेच लहान होवून
       नजरेत बघत बसावसं वाटतं
       अन तुझ्या डोळ्यांच्या पापण्यांमध्ये
       स्वप्न बनून खेळावासं वाटतं …।।३।।

भेट नेहमी पूर्ण व्हायची
आणि तू पण म्हणायचं
"तुझी खूप आठवण येईल
पुन्हा कधी भेटायचं ?"
       याचं प्रश्नाचं उत्तर देण्या
       तूच परत यावंसं वाटतं
       अन तुझ्या डोळ्यांच्या पापण्यांमध्ये
       स्वप्न बनून खेळावासं वाटतं …।।४।।

अन तुझ्या डोळ्यांच्या पापण्यांमध्ये
स्वप्न बनून निजावंसं वाटतं …

-प्रशांत भोपळे
(Date:१/११/२०१५)


Tag: Romantic Marathi Poem | Kavita | Love | Passion | Radha Krishna |

कोणी म्हणावं वेंड

कोणी म्हणावं वेंड
कोणी बावळट  मला म्हणावं
पण तुझ्या ओठांच्या कौतुकानं
नेहमीच मला सजवावं….।।

खूप आनंद होतो जेव्हा
तू येवून बोलतेस
शांत जर बसलो असेल
स्वतः येवून हसवतेस
       शांत माझं बसणं का
       तुला सहन न व्हावं
       अन तुझ्या ओठांच्या कौतुकानं
       नेहमीच मला सजवावं….।।१।।

हसण्यात तुझ्या नेहमी
मन माझं हसतं
अन नाव तुझं घेता ते
लाजून लपून बसतं
       त्या मनाचे सगळे नखरे
       तुला आपसूक समजावं
       अन तुझ्या ओठांच्या कौतुकानं
       नेहमीच मला सजवावं….।।२।।

माझ्या कविता नेहमी तू
मन लावून वाचतेस
"मीच याची राधा का ?"
विचार हाच करतेस
       मिरा बनून तूच मग
       माझ्या प्रेमात पडावं
       अन तुझ्या ओठांच्या कौतुकानं
       नेहमीच मला सजवावं….।।३।।

-प्रशांत भोपळे
(Date:३१/१०/२०१५)


Tag: Romantic Marathi Poem | Kavita | Love | Passion | Radha Krishna |

इतकं प्रेम का करतो ?

 तुला कोणी बघीतले तर
सहन मला होत नाही
इतकं प्रेम का करतो
माझं मलाच कळत नाही……।।

कळत नाही का तुझी
प्रत्तेक गोष्ट हेरतो
नजरेत तुझ्या वाचून तुझी
प्रत्तेक इच्छा पूर्ण करतो
       तुला न कळता तुझी
       कोणतीच हौस उरत नाही
       इतकं प्रेम का करतो
       माझं मलाच कळत नाही……।।१।।

कधी खळी कधी डोळे
याचं कौतूक करतो
तुझ्या अदा नेहमीच असं
काव्यामध्ये लिहतो
       तुझ्या शिवाय कवितेत माझ्या
       दुसरं कोणीच दिसतं नाही
       इतकं प्रेम का करतो
       माझं मलाच कळत नाही……।।२।।

तुझं येण तुझं जाणं
स्वप्नात रोज दिसते
साथ तुझी स्वप्न सागरी
आनंदी मज करून जाते
       निघून जाण स्वप्नातून
       सहन मला होत नाही
       इतकं प्रेम का करतो
       माझं मलाच कळत नाही……।।३।।

तुझं  हास्य पाहण्यासाठी
जीवाची पण पैज असते
पाणावलेल्या नयनी तुझ्या
माझे हृदय थैर्य असते
       तुला हसता पाहील की
       आनंद कमी पडत नाही
       इतकं प्रेम का करतो
       माझं मलाच कळत नाही……।।४।।
इतकं प्रेम का करतो
माझं मलाच कळत नाही……

-प्रशांत भोपळे
(Date:३०/१०/२०१५)

Tag: Romantic Marathi Poem | Kavita | Love | Passion | Radha Krishna |




प्रेमाची किंम्मत

तुझं प्रेम झाडासाठी
मुळासारखी बात आहे
माझं अस्थित्व टिकवून जणू
शेवटपर्यंत साथ आहे……।।

"माझ्या प्रेमाची किंम्मत काय?"
जेव्हा तू विचारलंस
कसं सांगू अमुल्य रत्नाला तू
मापू का ग पाहिलंस….
       विकून सारं जग कुबेरा
       तरी किंमत अपूर्ण आहे
       माझं अस्थित्व टिकवून जणू
       शेवटपर्यंत साथ आहे……।।१।।

तुझं प्रेम सखे जणू
हृदयासाठी श्वास आहे
नसेल प्रेम तुझं तर
जीवन जणू शाप आहे
       तुझं प्रेम आयुष्यात माझ्या
       जगणं माझं उरलेलं
       माझं अस्थित्व टिकवून ते
       शेवट परियंत पुरलेलं……।।२।।
 माझं अस्थित्व टिकवून ते
शेवट परियंत पुरलेलं……

-प्रशांत भोपळे
(Date:२९/१०/२०१५)

Tag: Romantic Marathi Poem | Kavita | Love | Passion | Radha Krishna |

पुन्हा नव्याने

मालवणाऱ्या दिव्यामध्ये
तेल थोडं भरुया
चलं सखे पुन्हा नव्याने
प्रेम आपण करूया……।।

पावला गणित पावलं सखे
कमी होती पडली होती
आपल्या नात्याच्या वस्त्राची
घडी थोडी मोडली होती
       उसवलेल्या जुन्या वस्त्राचे
       धागे पुन्हा विणूया
       चलं सखे पुन्हा नव्याने
       प्रेम आपण करूया……।।१।।

काही कविता राहिल्या होत्या
काव्य आहेत अधूरी
आपल्या बोलक्या नात्याची
कहाणी आहे अधुरी
       चलं यमक जुळवून आपण
       पुस्तक पूर्ण करूया
       चलं सखे पुन्हा नव्याने
       प्रेम आपण करूया……।।२।।

प्राजक्ताची ती फुले सखे
अजून आहेत रुसलेली
काही आपण वेचली होती
काही तिथेच राहिलीली
       चलं भेटून पुन्हा त्यांना
       रुसवा त्यांचा काढूया
       चलं सखे पुन्हा नव्याने
       प्रेम आपण करूया……।।३।।

पाऊल वाटा आपल्या जणू
हरवून गेल्या आहेत
चोर वाटा मनामधल्या
लपून बसल्या आहेत
        पुन्हा बनून मित्र वाटाड्या
       नवे रस्ते शोधूया
       चलं सखे पुन्हा नव्याने
       प्रेम आपण करूया……।।४।।

-प्रशांत भोपळे
(Date:२८/१०/२०१५)

Tag: Romantic Marathi Poem | Kavita | Love | Passion | Radha Krishna |

बुधवार, ४ नोव्हेंबर, २०१५

फक्त लढ

गर्दीमध्ये चालता चालता
स्वतः एकटच जगायचं
जीवन असंच आहे वेडी
असंच असतं जगायचं

आपलं दुखं लापवन्यासाठी
सगळ्यांसोबत हसायचं
अन एकांतात राहून वेड्या
डोळ्यांना त्या डोळ्यांना भिजवायचं
       एकटेपणाच्या अंधारात      
       मुसमुसत बसायचं
       जीवन असंच आहे वेडी
       पण आता असं नाही  जगायचं…।।१।।

त्याच गर्दीत चालता-चालता
हात तुझा धरेण
आणि हाती धरून हात तुझा
"फक्त लढ" म्हणेन
       तुझ्या गाली खेळण्याकरिता
       हास्य तुझं बनायचं
       जीवन असंच आहे वेडी
       पण आता असं नाही  जगायचं…।।२।।

बघ एकदा माझ्याकडे
असं नसत जगायचं
जीवन अशातच रडवणारा
आपण त्याला हसवायचं
       जीवन असेल कसातरी
       हात धरून जगायचं
       जीवन असंच आहे वेडी
       पण आता असं नाही  जगायचं…।।३।।

-प्रशांत भोपळे
(Date:२७/१०/२०१५)

Tag: Romantic Marathi Poem | Kavita | Love | Passion | Radha Krishna |

सोमवार, २ नोव्हेंबर, २०१५

आठवणींचा गजरा

प्राजक्ताच्या झाडाला
बहर बनून फुललेला
आठवणींचा गजरा जणू
मनामध्ये माळलेला…
       पाहून ती फुले मला
       आठवण तुझी येते
       डोळ्यांमधल्या पाण्याने
       भिजून परत फुलते
तू जणू फुल ते
प्राजक्ता चे दिसतेस
माझ्या मना वेडं करून
हळूच रोज फुलतेस
       रोज सकाळी आठवण तुझी
       कोकीळागत गाते
       छेडून माझ्या कानाला ती
       हळूच उठवून जाते
मग मात्र दिवसभर
सोबत ती असते
माझ्या मधल्या कृष्णाला
तू पूर्ण करून जाते
       माझ्या मधल्या कृष्णाला
       तू पूर्ण करून जाते.....


-प्रशांत भोपळे
(Date: २६/१०/२०१५)

Tag: Romantic Marathi Poem | Kavita | Love | Passion | Radha Krishna |

तुझ्यासाठी

ऊन सावली च्या खेळामध्ये
सावली तुझी बनेन
अन माथ्यावरती भिजलेला
घाम तुझा बनेन मी
       अश्या वेळी थंड हवेचा
       झुळूक मीच बनेल
       तुझ्यासाठी शाम तुझा
       जिंकून सुद्धा हरेल ….।।१।।

बनेल मी डोळे तुझे
जग सारं बघण्याकरता
अन बनून जाईन वात जळती
तुला प्रकाश देण्याकरिता
       मनमंदिरी पुजता तुला
       दिवा तुझा बनेल
       अन तुझ्यासाठी शाम तुझा
       जिंकून सुद्धा हरेल ….।।२।।

कधी बनेल सुर्य मावळी
क्षीतीजा वरती रंगान्याकरता
कधी बनेल चंद्र पुनवेचा
मनात लाटा भरण्या करता
       त्या लाटांचा आवाज बनून
       मनात तुझ्या घुमेल
       तुझ्यासाठी शाम तुझा
       जिंकून सुद्धा हरेल ….।।३।।

कधी बनेल घरटे तुझे
चिमण्या सारखं जपण्याकरता
पंख तुला फुटूपर्यंत
घास प्रितीचा भरण्याकरता
       उडून जाता तू आकाशी
       उरलं घरटं बनेल
       अन तुझ्यासाठी शाम तुझा
       जिंकून सुद्धा हरेल ….।।४।।

तुझ्यासाठी शाम तुझा
जिंकून सुद्धा हरेल ….


-प्रशांत भोपळे
(Date: २५/१०/२०१५)

Tag: Romantic Marathi Poem | Kavita | Love | Passion | Radha Krishna |

आयुष्य माझं गोठलेलं

तुझं कौतुक करून करून
पान एक भरलेलं
अन तुझ्या गालाच्या खळीमध्ये
आयुष्य माझं गोठलेल…….।।
 
तू अशी तू तशी
काय तुला सांगू
इतकं सुंदर का बनविलं
देवाशी का भांडू
       देवानं पण तुझ्या रुपी
       भ्रंमांड सारं लोटलेला
       अन तुझ्या गालाच्या खळीमध्ये
       आयुष्य माझं गोठलेल…….।।१।।

जेव्हा तुझ्या कायेवर
माझी नजर लागली रेंगू
लाजतेस किती तू
आता… काय तुला सांगू
       त्या लाजऱ्या नजरेमध्ये
       दरिया प्यार का बेहलेल
       अन तुझ्या गालाच्या खळीमध्ये
       आयुष्य माझं गोठलेल…….।।२।।

बडबड तुझी वेड्या लाटा
किनारी मी असताना
बोलक्या तुझ्या डोळ्यामध्ये
माझी कविता लिहिताना
       त्या लाटांच्या आवाजामध्ये माझं  
       मन आहे रमलेला
       अन तुझ्या गालाच्या खळीमध्ये
       आयुष्य माझं गोठलेल…….।।२।।

कोणी वेडा म्हणेल जेव्हा
कविता ही वाचेल
तुझ्या रुपाची थोडी टिपणी
त्यांना जेव्हा दिसेल
       तुझं नसणं माझ्यासाठी
       माझं अस्थित्व हरलेलं
       अन तुझ्या गालाच्या खळीमध्ये
       आयुष्य माझं गोठलेल…….।।३।।


-प्रशांत भोपळे
(Date: २४/१०/२०१५)


Tag: Romantic Marathi Poem | Kavita | Love | Passion | Radha Krishna |Dream  

थोडं असं....थोडं तसं

स्वप्नामध्ये चोरून छुपून
आपण सारखं भेटायचं
थोडं असं थोडं तसं
प्रेम आपण करायचं….।।

कधी मुक्याने सारं काही
आपण बोलून बघायचं
कधी पलके झुकवून आपण
चोरून दुसऱ्या बघायचं
       तेव्हा माझ्या नजरेत तू
       स्वतःलाच बघून हसायचं
       थोडं असं थोडं तसं
       प्रेम आपण करायचं….।।१।।

कधी चांदण्या राती मध्ये
तारे मोजत निजायच
तुझ्या रूपाचं कौतूक करून
चंद्राला मी चिडवायचं
       चंद्राने पण रुसून तेव्हा
       ढगाआड लपायचं
       थोडं असं थोडं तसं
       प्रेम आपण करायचं….।।२।।

कधी सागर किनाऱ्यावर
वाळूमध्ये गिरवायचं
किल्ला करून कधी प्रितीचा
लाटांनपासून जपायचं
       सांज मावळे पर्यंत मग
       किल्लया जवळ बसायचं
       थोडं असं थोडं तसं
       प्रेम आपण करायचं….।।३।।

कधी थोडं भांडायचं
कधी तू पण रुसायचं
तुला मनवन्यासाठी मग मी
लाखो कष्ट करायचं
       माझ्या मिठीत येवून मग तू
       जग सारं विसरायचं
       थोडं असं थोडं तसं
       प्रेम आपण करायचं….।।४।।

थोडं असं थोडं तसं
स्वप्नात असं जगायचं.....


-प्रशांत भोपळे
(Date: २३/१०/२०१५)
Tag: Romantic Marathi Poem | Kavita | Love | Passion | Radha Krishna |Dream