शुक्रवार, २७ नोव्हेंबर, २०१५

मला पाऊस आवडत नाही

मला पाऊस आवडत नाही
कारण तिची आठवण येते
ओल्याचिंब सरीमध्ये
भिजून समोर उभी होते........।।

तिचा बालिश वागणं
अन तिची चंचल अदा
या पावसातच झालो होतो
तिच्यावरती फिदा
       नक्कल करून तिची
       त्या पावसाला पण मज्जा येते
       म्हणून पाऊस आवडत नाही
       कारण तिची आठवण येते ..........।।१।।

पहिली भेट पावसातली
ती विजेसारखी चमकली होती
धुंद सुसाट वाऱ्यासारखी
मनामध्ये भिणली होती
       त्या बेधुंद क्षणांची
       पुन्हा जाणीव देवून जाते
       म्हणून पाऊस आवडत नाही
       कारण तिची आठवण येते ..........।।२।।

माझ्या मधल्या चातकाला ती
पावसारखी वाटायची
तिची भेट सकाळी होईल
म्हणून रात्र जागायची
       ओल्या चिंब पावसासारखी
       भिजून मग ती भेटायला येते
       म्हणून पाऊस आवडत नाही
       कारण तिची आठवण येते ..........।।३।।

-प्रशांत भोपळे
(Date:२१/११/२०१५)

Tag:Romantic | Marathi | Poem | Love | Passion | Kavita

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा