सोमवार, २ नोव्हेंबर, २०१५

थोडं असं....थोडं तसं

स्वप्नामध्ये चोरून छुपून
आपण सारखं भेटायचं
थोडं असं थोडं तसं
प्रेम आपण करायचं….।।

कधी मुक्याने सारं काही
आपण बोलून बघायचं
कधी पलके झुकवून आपण
चोरून दुसऱ्या बघायचं
       तेव्हा माझ्या नजरेत तू
       स्वतःलाच बघून हसायचं
       थोडं असं थोडं तसं
       प्रेम आपण करायचं….।।१।।

कधी चांदण्या राती मध्ये
तारे मोजत निजायच
तुझ्या रूपाचं कौतूक करून
चंद्राला मी चिडवायचं
       चंद्राने पण रुसून तेव्हा
       ढगाआड लपायचं
       थोडं असं थोडं तसं
       प्रेम आपण करायचं….।।२।।

कधी सागर किनाऱ्यावर
वाळूमध्ये गिरवायचं
किल्ला करून कधी प्रितीचा
लाटांनपासून जपायचं
       सांज मावळे पर्यंत मग
       किल्लया जवळ बसायचं
       थोडं असं थोडं तसं
       प्रेम आपण करायचं….।।३।।

कधी थोडं भांडायचं
कधी तू पण रुसायचं
तुला मनवन्यासाठी मग मी
लाखो कष्ट करायचं
       माझ्या मिठीत येवून मग तू
       जग सारं विसरायचं
       थोडं असं थोडं तसं
       प्रेम आपण करायचं….।।४।।

थोडं असं थोडं तसं
स्वप्नात असं जगायचं.....


-प्रशांत भोपळे
(Date: २३/१०/२०१५)
Tag: Romantic Marathi Poem | Kavita | Love | Passion | Radha Krishna |Dream  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा