गुरुवार, ५ नोव्हेंबर, २०१५

पुन्हा नव्याने

मालवणाऱ्या दिव्यामध्ये
तेल थोडं भरुया
चलं सखे पुन्हा नव्याने
प्रेम आपण करूया……।।

पावला गणित पावलं सखे
कमी होती पडली होती
आपल्या नात्याच्या वस्त्राची
घडी थोडी मोडली होती
       उसवलेल्या जुन्या वस्त्राचे
       धागे पुन्हा विणूया
       चलं सखे पुन्हा नव्याने
       प्रेम आपण करूया……।।१।।

काही कविता राहिल्या होत्या
काव्य आहेत अधूरी
आपल्या बोलक्या नात्याची
कहाणी आहे अधुरी
       चलं यमक जुळवून आपण
       पुस्तक पूर्ण करूया
       चलं सखे पुन्हा नव्याने
       प्रेम आपण करूया……।।२।।

प्राजक्ताची ती फुले सखे
अजून आहेत रुसलेली
काही आपण वेचली होती
काही तिथेच राहिलीली
       चलं भेटून पुन्हा त्यांना
       रुसवा त्यांचा काढूया
       चलं सखे पुन्हा नव्याने
       प्रेम आपण करूया……।।३।।

पाऊल वाटा आपल्या जणू
हरवून गेल्या आहेत
चोर वाटा मनामधल्या
लपून बसल्या आहेत
        पुन्हा बनून मित्र वाटाड्या
       नवे रस्ते शोधूया
       चलं सखे पुन्हा नव्याने
       प्रेम आपण करूया……।।४।।

-प्रशांत भोपळे
(Date:२८/१०/२०१५)

Tag: Romantic Marathi Poem | Kavita | Love | Passion | Radha Krishna |

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा