मंगळवार, ५ एप्रिल, २०१६

Coffee......??

तू समोर अशी माझ्या
मला वेडी करता-करता
क्षण सारे थांबून गेले
एकटक तुला बघता-बघता

काय सांगू अदा तुझी
कवितेत कशी मांडू ?
नम्र तुझे रूप सोनेरी
शब्दात कसे बांधू ?

काहीच न्हवते सुचत मला
समोर तुझ्या बसता-बसता
मग क्षण थांबून गेले
एकटक तुला बघता-बघता…….।।१।।

अश्या वेळी दोघांमध्ये
coffee ची जोडी बसली होती
हरवून गारवा स्वताची
ती एकमेकात रमली होती

त्यांना सुद्धा प्रेम जडले
तुझ्या माझ्यात झुलता-झुलता
क्षण सारे थांबून गेले
एकटक तुला बघता-बघता……।।२।।

वाटलं मग जग सारं
इथंच थांबून बसावं
तुझ्या सोबत coffee पीत
कायम असंच जगावं

अशीच वेळ निघून गेली
एक एक घोट घेता-घेता
क्षण मात्र  थांबून गेले
एकटक तुला बघता-बघता….।।३।।

अजून सुद्धा जिभेवरती
coffee तिचं घुटमळते
आठवण काढून तुझी मग
माझे मन तळमळते

पुन्हा भेटू नव्याने ग
coffee नवीन पिण्याकरिता
क्षण पुन्हा थांबून जातील
एकटक तुला बघता-बघता…… ।।४।।

क्षण पुन्हा थांबून जातील
एकटक तुला बघता-बघता……


-प्रशांत भोपळे
(Date: ०५/०४/२०१६)  


Tag: Love| Passion |Marathi | Poem | Kavita | Romantic

ते मोजके क्षण

       मोजके क्षण तुझ्यासवे
       माझे भान हरपून गेले
       तुझ्यामधले काही दुवे
       माझ्यामध्ये सोडून गेले

तू फुलपांखरू अल्लड वेडी
तू नाजूक नम्र कळी
पहिल्या पावसाच्या चाहूल होता
स्वछंद नाचणारी मोर परी

       तुझ्या हास्यामध्ये सखे
       माझे मन विरून गेले
       तुझ्यामधले काही दुवे
       मग माझ्यामध्ये राहून गेले…. ।।१।।

बोलका तुझा चेहरा
अन अबोल गाली खळी
चश्यामागून चोरून पाहती
हिरवा चाफा एक कळी

       त्या कळीची बेधुंद हास्य
       खळीत मला बुडवून गेले
       तुझ्यामधले काही दुवे
       मग माझ्याजवळ सोडून गेले …. ।।२।।

मोजकेच क्षण होते पदरी
मला तेव्हा जगण्याकरिता
तुझ्या नयनी वेड्या सारखे
बुडून मग वाहण्याकरिता

       तू निघून जातो म्हणता
       क्षण तसेच गोठून गेले
       तुझ्यामधले काही दुवे
       माझ्यामध्ये सोडून गेले…।।३।।

थांबवून तुला घ्यावे
असा विचार मनात आला
तोडून सारे बंधन हा
मन वेडा झाला

       पण वेळ संपली आता
       घड्याळ माझे सांगून गेले
       तुझ्यामधले काही दुवे
       मग माझ्यामध्येच राहून गेले…।।४।।

तुझ्यामधले काही दुवे
मग माझ्यामध्येच राहून गेले…


-प्रशांत भोपळे
(Date: ०५/०४/२०१६)

Tag: Marathi | Love |Passion |Poem |Romantic

रविवार, २८ फेब्रुवारी, २०१६

राधेचे रुप....

कसे सांगू शब्दामध्ये
राधा माझी कशी आहे
प्रत्तेक गोपिका लाजेल
अदा तिची अशी आहे.……।।

राधा माझी माऊली सारखी
प्रेम बनून वाहणारी
राधा माझी हवे सारखी
सतत साथ देणारी      
       राधा म्हणजे प्रेमाचे
       फक्त एक सुखं आहे
       कसे सांगू शब्दामध्ये
       राधेचे जे रुप आहे…….।।१।।

राधा जणू सागरासारखी
खळखळून हसणारी
शिपल्या गणित लाखो दुःखं
खोल लपवून ठेवणारी
       बोलणं जणू लाटेमागे
       अजून एक लाट आहे
       कसे सांगू शब्दामध्ये
       राधेचे जे रुप आहे…….।।२।।

अश्रु तिच्या नयनी कधी
टपोरे ते मोती
त्यांची किंमत कशी सांगू
सगळीच रत्ने खोटी
       तिच्या एक एक अश्रू मागे
       माझे ठोके चुकत आहे
       कसे सांगू शब्दामध्ये
       राधेचे जे रुप आहे…….।।३।।

हास्य माझ्या राधेचे
पावसाच्या सरि बरसती
भिजवून साऱ्या गावाला
माझ्यावरती परतती
       तिच्या हास्य पुढे सारे
       भ्रमांड सुद्धा मूक आहे
       कसे सांगू शब्दामध्ये
       राधेचे जे रुप आहे…….।।४।।


कसे सांगू शब्दामध्ये
राधेचे जे रुप आहे…….


अशी आहे माझी राधा

-प्रशांत भोपळे
(Date:२७/०२/२०१६)

Tag: #love # Passion #marathi #poem #radha #krishna #kanha

बुधवार, २४ फेब्रुवारी, २०१६

तू, मी आणि कॉफी

एका संद्याकाळी फक्त
तू, मी आणि कॉफी
तिघेच बसलो होतो
आणि काहीच नव्हतं बाकी…….।।

दूर कराया एकटेपणा
कॉफी ला साखरेची साथ
तुझ्या माझ्या प्रेमाची
अशीच आहे बात
       बस्स तुझ्या मध्ये प्रित माझी
       विर्घळायची बाकी
       एका संद्याकाळी फक्त
       तू, मी आणि कॉफी…….।।१।।

नजरेत तुझ्या माझी नजर
खोलवर बुडली होती
अबोल आपलं प्रेम ती
इशार्यांनीच बोलत होती
       प्रेमाची ही कबुली पण
       कधीच नाही ओठी
       एका संद्याकाळी फक्त
       तू, मी आणि कॉफी…….।।२।।

वेळ असाच निघून गेला
एकमेकात हरता-हरता
तुझं-माझं आयुष्य
पूर्ण थोडं करता-करता
       अश्या क्षणी वेळेच पण
       भानच विसरू खोटी
       एका संद्याकाळी फक्त
       तू, मी आणि कॉफी…….।।३।।

शेवटी नाही राहवून मी
हात तुझा हाती घेतो
"प्रेम करतेस का माझ्यावर?"
एवढंच तुला बोलून जातो
       तुझ्या झुकल्या नजरेमध्ये
       सगळे उत्तर बाकी
       एका संद्याकाळी फक्त
       तू, मी आणि कॉफी…….।।४।।

एका संद्याकाळी फक्त
तू, मी आणि कॉफी……

-प्रशांत भोपळे
(Date:२४/०२/२०१६)

Tag: Romantic | Marathi | Poem | Kavita | Passion । Love 

फोटो

तूझी माझी आठवण एका
फोटो मध्ये बंद आहे
त्या आठवणी मध्ये माझे
आयुष्य बे धुंद आहे………।।


तू समोर नसता कधी
फोटो तो पहावा
कवितेचा गजरा करून
केसात तुझ्या माळावा
       त्या गजऱ्याचा सुगंध जणू
       प्रेमाचा ग रंग आहे
       तूझी माझी आठवण एका
       फोटो मध्ये बंद आहे…….।।१।।

हास्य तुझे मला मग
गोड गुळ वाटते
वेडे होवून मन मग
मुंगी बनून छेडते
       त्या हास्या पायी माझे
       मन जणू धुंद आहे
       तूझी माझी आठवण एका
       फोटो मध्ये बंद आहे…….।।२।।

तूझी माझी आठवण एका
फोटो मध्ये बंद आहे…….


-प्रशांत भोपळे
(Date:२४/०२/२०१६)

Tag: Romantic | Marathi | Poem | Kavita | Passion । Love 

शनिवार, २३ जानेवारी, २०१६

लाल-परि

सकाळ होते सोनेरी
ती झोपेमधून उठते
आळस थोडा जावा म्हणून
खिडकीत उभी राहते
       खिडकीमध्ये सूर्य मग
       निरखून असा बघतो
       अन पाहून तिचे रूप
       तिला लाल-परि म्हणतो……।।

नजर कधी भिडली तर
लपून ती बसते
ढगात लपून बसला तर
उगाच मनात रुसते
       तिला असं चिडवायसाठी
       मुद्दाम असं  करतो
       खिडकीमध्ये सूर्य मग
       निरखून तिला बघतो……।।१।।

कधी ओल्या केसांनी ती
उन्हात उभी असते
जणू दवांची शाल पांघरून
प्राजक्ता थंडीत फुलते
       त्या फुलाचे शितल रूप
       डोळे भरून पाहतो
       खिडकीमध्ये सूर्य मग
       निरखून असा बघतो……।।२।।

ऊन पावसाचा खेळ झाला
तर मुद्दाम ती भिजते
ओल्या चिंब कायेने ती
सूर्याकडे बघते
       अश्या वेळी सुर्य बावरा
       लाजरा बुजरा बनतो
       ढगाआड सूर्य मग
       निरखून तिला बघतो……।।३।।

खिडकीमध्ये सूर्य रोज
निरखून असा बघतो….


अशी आहे माझी राधा

-प्रशांत भोपळे
(Date:२३/०१/२०१६)

Tag: Romantic | Marathi | Poem | Kavita | Passion

सोमवार, ११ जानेवारी, २०१६

शेवटची भेट

शेवटची भेट हिच आपली
प्रत्तेक भेटीत म्हणायचं
घेवून गोड निरोप मग तू
परतीच्या वाटेस लागायचं……।।

परतीच्या वाटेवरती मग
जीव तुझा धड-धडतो
पुन्हा कधी भेट होईल
हाच विचार घुटमळतो
       अश्या वेळी मेंदूने तुझ्या
       काळजावर लगाम घालायचं
       शेवटची भेट हिच आपली
       प्रत्तेक भेटीत म्हणायचं…….।।१।।

कधी आठवणी पाऊस बनून
मनास तुझ्या भिजवून जातात
कधी कोवळ्या उन्हागत
चटके तुला देवून जातात
       त्या आठवणींमध्ये मग
       रमून तू पण हसायचे
       शेवटची भेट हिच आपली
       प्रत्तेक भेटीत म्हणायचं…….।।२।।

कधी भरल्या गर्दीमध्ये
तू मला शोधतेस
असतो मी थोडा आसपास
कसं तू हे हेरतेस
       लपून मग मी चोरून स्वतः
       निघून तेथून जायचे
       शेवटची भेट हिच आपली
       प्रत्तेक भेटीत म्हणायचं…….।।३।।

कळते मला हाक तुझी
मनापासून घातलेली
पुन्हा नव्या भेटीसाठी
राधा माझी पेटलेली
       कान्हाला या भेटायला मग
       राधेनच हो यायचं
       शेवटची भेट हिच आपली
       प्रत्तेक भेटीत म्हणायचं…….।।४।।


-प्रशांत भोपळे
(Date: ५/१/२०१५)

Love | Romantic | Passion| Kavita | Poem

काय बोलू मी

काय बोलू मी की
मस्त तुला वाटेल
जास्त बोललो मी तर
हुंदका तुझा दाटेल……।।

बोलू का मी प्रेम माझं
ढगा एवढं जास्त आहे
तुझ्या डोळ्यातलं जग सखे
माझ्यासाठी मस्त आहे
       तुझ्या डोळ्यात सखे जणू
       पूर्ण आयुष्य कटेल
       जास्त बोललो मी तर
       हुंदका तुझा दाटेल…….।।१।।

बोलू का मी आठवण तुझी
किती मला येते
त्याच आठवणींन मध्ये रोज
रात्र सरून जाते
       झोपलीस तू आज तर
       स्वप्नात तुला भेटेल
       जास्त बोललो मी तर
       हुंदका तुझा दाटेल…….।।२।।

बोलू का मी सागर किणारा
साद रोज देतो
भेटायला तू येशील म्हणून
रस्ता निरखून पाहतो
       मिठीन घेईन तुला जेव्हा
       आपण पुन्हा भेटेल
       जास्त बोललो मी तर
       हुंदका तुझा दाटेल…….।।३।।

बोलू कसं तुझा अबोला
काटा मनावर येतो
तुझं हास्य पाहण्यासाठी
वेडा पिसा होतो
       तेच हास्य पाहण्यासाठी
       मरून परत उठेल
       जास्त बोललो मी तर
       हुंदका तुझा दाटेल…….।।४।।

-प्रशांत भोपळे
(Date: ५/१/२०१५)

Love | Romantic | Passion| Kavita | Poem