मंगळवार, ५ एप्रिल, २०१६

ते मोजके क्षण

       मोजके क्षण तुझ्यासवे
       माझे भान हरपून गेले
       तुझ्यामधले काही दुवे
       माझ्यामध्ये सोडून गेले

तू फुलपांखरू अल्लड वेडी
तू नाजूक नम्र कळी
पहिल्या पावसाच्या चाहूल होता
स्वछंद नाचणारी मोर परी

       तुझ्या हास्यामध्ये सखे
       माझे मन विरून गेले
       तुझ्यामधले काही दुवे
       मग माझ्यामध्ये राहून गेले…. ।।१।।

बोलका तुझा चेहरा
अन अबोल गाली खळी
चश्यामागून चोरून पाहती
हिरवा चाफा एक कळी

       त्या कळीची बेधुंद हास्य
       खळीत मला बुडवून गेले
       तुझ्यामधले काही दुवे
       मग माझ्याजवळ सोडून गेले …. ।।२।।

मोजकेच क्षण होते पदरी
मला तेव्हा जगण्याकरिता
तुझ्या नयनी वेड्या सारखे
बुडून मग वाहण्याकरिता

       तू निघून जातो म्हणता
       क्षण तसेच गोठून गेले
       तुझ्यामधले काही दुवे
       माझ्यामध्ये सोडून गेले…।।३।।

थांबवून तुला घ्यावे
असा विचार मनात आला
तोडून सारे बंधन हा
मन वेडा झाला

       पण वेळ संपली आता
       घड्याळ माझे सांगून गेले
       तुझ्यामधले काही दुवे
       मग माझ्यामध्येच राहून गेले…।।४।।

तुझ्यामधले काही दुवे
मग माझ्यामध्येच राहून गेले…


-प्रशांत भोपळे
(Date: ०५/०४/२०१६)

Tag: Marathi | Love |Passion |Poem |Romantic

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा