शुक्रवार, ३० ऑक्टोबर, २०१५

आज वाटतं पुन्हा मी

आज पुन्हा मला
वेडा व्हावस वाटतंय
वेड्यासारखं तुझ्यावरती
प्रेम करावसं वाटतंय

पुन्हा वाटतं तुझ्यासाठी
काव्य नवी करावं
तुझ्या गालाच्या लालीनं मग
शाई बनून उतरावं
       त्याचं शाईने तुझे रूप
       कवितेत पुन्हा मांडवं
       आज वाटतं पुन्हा मी
       प्रेम वेडं बनावं……।।१।।

प्रेम किती जडलेलं आता
कसं तुला सांगू
बोलशील तू तर चंद्र-तारे
देईन ओंजळीत सांडू
       सुखांनी साऱ्या तुझी
       ओंजळ मी भरावं
       आज वाटतं पुन्हा मी
       प्रेम वेडं बनावं……।।२।।

तुझ्या चेहऱ्याला आज
कमळ म्हणावसं वाटतंय
होवून भोंगा तुझ्या भोवती
उडत रहावसं वाटतंय
       नाना कष्ट करून तुला
       पुन्हा प्रेमात पाडावं
       आज वाटतं पुन्हा मी
       प्रेम वेडं बनावं……।।३।।

वाटत पुन्हा तुझ्याकडे
टक लावून बघावं
आघात होवून नजरेचा
जखमी होवून पडावं
       त्याच जखमी तुझं हास्य
       औषध बनून बरसावं
       आज वाटतं पुन्हा मी
       प्रेम वेडं बनावं……।।४।।

मग गाल ओढून माझे
"वेडा" मला म्हणावं
जग सारं विसरून तू पण
प्रेमात माझ्या पडावं
       "का इतका प्रेम करतोस?"
       असं तूच पुन्हा म्हणावं
       आज वाटतं पुन्हा मी
       प्रेम वेडं बनावं……।।५।।

आज वाटतं पुन्हा मी
प्रेम वेडं बनावं.......

-प्रशांत भोपळे
(Date:२२/१०/२०१५)

Tag: Love Poem | Marathi Kavita | passion Love | radha krishna

ती म्हणाली......!

ती म्हणाली "माझ्यावरी
कविता करून दाखव"
मी म्हणालो एकदा फक्त
हसून मला दाखव…।।

असं  म्हणता खुदकन हसली
उगाच गाली लाजली
तिच्या गाली खळीमध्ये
कविता माझी गोठली
       मी म्हणालो परत एकदा
       लाजून असंच दाखव
       ती म्हणाली "आधी मला
       कविता करून दाखव"…….।।१।।

बोलता बोलता बट सुटली
गाली येवून राहिली
सावरून मग बटेला तीने
नजर रोखून पाहिली
       बटेत  गुंतलेल्या माझ्या मनाला
       जरा…  मोकळा करून दाखव
       ती म्हणाली "आधी माझ्यावर
       कविता करून दाखव"……।।२।।

मग हात घेवूनी हाती तिचा
बोटांनी मी लिहिले
कावरी-बावरी होवून तिने
माझ्याकडे पहिले
       लिहीलं आहे खूप काही
       वाचून तूच दाखवं
       ती म्हणाली "नाही नाही
       परत करून दाखवं"……।।३।।


शेवटी झाली नाराज आता
रुसून तू  बसली
तिला मनवायसाठी बघ मज
कविता नवी सुचली
       वाचून माझ्या डोळ्यात मग तू
       होकार बोलून दाखव
       लाजून म्हणे "परत नवीन
       कविता करून दाखव"……।।४।।
लाजून म्हणे "परत नवीन
कविता करून दाखव"……

-प्रशांत भोपळे
(Date:२१/१०/२०१५)

Tag: love poem | romantic marathi kavita | passion | Radha Krishna

शुक्रवार, २३ ऑक्टोबर, २०१५

कृष्ण-बावरी

आरसा समोर घेवून जसा
स्वतःला माझ्यात बघते
तुझ्यामध्ये राधा मला
नेहमीच अशी दिसते……।।

हट्ट  कधी करते
कधी बालीश ती पण होते
भांडण करून माझ्याशी  कधी
रुसून मग ती बसते
       हाक ऐकूण बासरीची
       मग लगेच धावून येते
       तुझ्यामध्ये राधा मला
       नेहमीच अशी दिसते……।।१।।

दूर उभी धुंदीत माझ्या
भान हरपून जाते
उगाच लपून छपून कधी
माझे मन बघते
       धडधड होऊन काळजाची त्या
       मिठीत येवू बघते
       तुझ्यामध्ये राधा मला
       नेहमीच अशी दिसते……।।२।।


कधी बनते माय माझी
कधी प्रियेसी बनते
कधी हवून सख्या सारखा
कान माझे पिळते
सगळ्याच नात्यांची गोडी मला
एकाच नात्यात देते
       तुझ्यामध्ये राधा मला
       नेहमीच अशी दिसते……।।३।।

कधी होवुनी वादळ वारे
मनात माझ्या येते
कधी होवुनी सरी प्रितीची
मलाच भिजवून हसते
       त्या प्रितीच्या रंगामध्ये
       स्वतः रंगून जगते
       तुझ्यामध्ये राधा मला
       नेहमीच अशी दिसते……।।४।।

धाव घेवूनी माझ्यासाठी
बंधन तोडूनी येते
जरी दुरावा सात जन्मीचा
माझी होवून जाते
       माझी होवून जाता-जाता
       कृष्ण बावरी बनते
       तुझ्यामध्ये राधा मला
       नेहमीच अशी दिसते……।।५।।
तुझ्यामध्ये राधा मला
नेहमीच अशी दिसते……

-प्रशांत भोपळे
(Date:२०/१०/२०१५)

तुझ्यासारखा तुझा मी

माझ्या कुशीतली तू ,
अन तुझ्या डोळ्यातला मी…
तुझ्या श्वासात बसलेला ,
तुझ्यासारखा तुझा मी…….।।
         
कवटाळून जेव्हा तुला
मिठीत माझ्या घेतो
दूर जाण्याच्या भीतीने
कंठ भरून येतो
       अश्या वेळी भिजलेल्या
       डोळ्यातसुद्धा  तुझ्या मी
       अन तुझ्या श्वासात बसलेला
       तुझ्यासारखा तुझा मी….।।१।।
हट्ट करून छोटा मोटा
तुला मी सतावलेला
लाड तुझे करून सारे
मिठीत तुझ्या शिरलेला
       प्रेमा पोटी तुझ्या
       जणू लहान लेकरू मी
       अन तुझ्या श्वासात बसलेला
       तुझ्यासारखा तुझा  मी….।।२।।
असेच राहावे हे क्षण
आयुष्य भर जगण्याकरता
तुझ्या या आठवणी साऱ्या
माझ्यामधल्या पश्या करता ।
       या आठवणी मधली गीते
       कुणा न….  कळली जी
       जणू तुझ्या श्वासात बसलेला
       तुझ्यासारखा तुझा मी …….।।३।।
तुझ्या  श्वासात बसलेला
तुझ्यासारखा तुझा मी …….

-प्रशांत भोपळे
(Date: १९/१०/२०१५)
Tag: Love |Romantic |Marathi | Poem |Kavita

क्षणोक्षणी

क्षणा-क्षणा मध्ये तुझे
प्रेम आहे पेरलेले
अन आठवणीत तुझ्या  जणु
आभाळ आज भरलेले .....

तू अशी वेड्या सवं
आभाळी या रंगते
इंद्रधणु जणू श्रावणी
क्षितिजावरती तरते
       त्याच क्षिताजावरती माझे
       अस्तित्व आहे टिकलेले
       तुझ्या आठवणी क्षणोक्षणी
       आभाळ हे भरलेले….।।१।।

तुझी काया जणू मंदिरी
दिप एक तेवलेला
तुझी काया जणू मंजिरी
वणवा नवा पेटलेला
       याच कायेवरती माझे
       प्रेम आहे जडलेले
       तुझ्या आठवणी क्षणोक्षणी
       आभाळ हे भरलेले….।।२।।

हास्य तुझे कसे सांगावे
गारवा हा प्रभाती
गालावरती सुर्य शोभती
खली जणू नभाती
       त्याच खळीमध्ये माझे
       आयुष्य आहे दडलेले
       तुझ्या आठवणी क्षणोक्षणी
       आभाळ हे भरलेले….।।३।।

डोळे जणू फुलपाखरे
प्रेमबागी या भिरभिरती
तुझ्या हास्याने सगळे क्षण हे
फुलाप्रमाणे फुल्फुलती
       त्याच हास्यासाठी सखे
       काव्य आज जमलेले
       तुझ्या आठवणी क्षणोक्षणी
       आभाळ हे भरलेले….।।४।।

तुझ्या आठवणी क्षणोक्षणी
आभाळ हे भरलेले….

-प्रशांत भोपळे
(Date:१८/१०/२०१५)


मंगळवार, २० ऑक्टोबर, २०१५

तुझे बोलके डोळे

नजरेत माझ्या प्रेम पाहून
लाजून घट्ट मिटतात
तुझे बोलके डोळे मला
खूप काही सांगतात….।।

म्हणतात कधी "वेडा" मला
कधी "निर्लज्ज" बोलतात
तक लावून पाहता तूला
"असं नको... बघु" म्हणतात
       वेडे होऊन माझ्यासाठी
       माझ्यामध्ये रमतात
       तुझे बोलके डोळे मला
       खूप काही सांगतात….।।१।।

बनवून कधी चातक मला
स्वतः चंद्र बनतात
कधी होऊनी रातराणी ते
स्वप्न माझे बघतात
       त्याच स्वप्नी माझ्यासाठी
       माझे जग बनतात
       तुझे बोलके डोळे मला
       खूप काही सांगतात….।।२।।

हरवून कधी माझ्यामध्ये
स्वतःला शोधत बसतात
म्हणतात मलाच प्रेमवेडा
पण वेंड माझेच बनतात
       याच वेड्या कृष्णाची ते
       वाट रोजच बघतात
       तुझे बोलके डोळे मला
       खूप काही सांगतात….।।३।।

दूर जाता पाणावूनी ते
चार थेंब गाळतात
वियोगाच्या दुःखामधी ते
पाऊस बनूनी भिजतात
       पुन्हा नव्या भेठीसाठी
       हाक मला देतात
       तुझे बोलके डोळे मला
       खूप काही सांगतात….।।४।।

भेट होते पुन्हा तेव्हा
मन भरून बघतात
"खूप miss केला तुला "
"मिठीत घे रे"  म्हणतात
       मिठीत घेता ओलेचिंब
       खांदे माझे करतात
       तुझे बोलके डोळे मला
       खूप काही सांगतात….।।५।।

तुझे बोलके डोळे मला
खूप काही सांगतात….

-प्रशांत भोपळे
(Date:१७/१०/२०१५)

Tag: Romantic Marathi Poem | Kavita | Love | Radha | Krishna | Eyes |

कोण ही राधा ?

तुझं  नसणं असण्यासारखं
म्हणून कविता जमतात
पण
"कोण रे तुझी राधा ?"
असे सगळेच मला म्हणतात…।।

जग आहे इतका मोठा
डोळे माझे दोन
कसं सांगू सगळ्यांना
राधा… आहे तरी कोण
       त्या राधेच्या शोधामध्ये
       डोळे माझे दमतात
       "कोण रे तुझी राधा ?"
       असे सगळेच मला म्हणतात…।।१।।

प्रत्तेक मुलीमध्ये तिचा
शोध घेत आहे
रोज नव्या धुंदीमध्ये
कविता नवी  लिहीत आहे
       मग नेमकी राधा कोण आहे
       कवितेत माझ्या शोधतात
       "कोण रे तुझी राधा ?"
       असे पुन्हा मला म्हणतात…।।२।।

कोण जाणे मनात माझ्या
छबी तुझी काय आहे
मी वासरू तिचे
कधी तू माझी माय आहे
       तुझ्या कुशीमध्ये माझी
       सगळी स्वप्न रेंगतात
       "अरे कोण तुझी राधा ?"
       मग सगळेच मला म्हणतात…।।३।।

कोण समजू शकेल आता
राधा कुठे कोण आहे
आत्मा आमची एक जरी
शरीरं ही दोन आहे
       माझ्या प्राणामध्ये फक्त
       आभास तुझे रेंगतात
       "कोण बरे राधा ही ?"
       सगळेच मला म्हणतात…।।४।।

"कोण बरे राधा ही ?"
सगळेच मला म्हणतात…

-प्रशांत भोपळे
(Date:१६/१०/२०१५)
Tag: Marathi Kavita | Romantic Poem | Radha Krishna | Love

शनिवार, १७ ऑक्टोबर, २०१५

मनचं फितूर झाले

ठरवले होते आपण कधी
प्रेम नाही करणार
मनचं फितूर झाले
त्याला कोण काय करणार…।।

ओळख तिची नवी-नवी
ध्यास तिचा नवा होता
डोळ्यांमध्ये तिच्या जणू
आभास कोणी नवा होता
       त्याच डोळ्यामध्ये आता
       पूर्ण आयुष्य जगणार
       मनचं फितूर झाले
       त्याला कोण काय करणार…।।१।।

कविता एखादी नवी-नवी
तिच्यावरती सुचली मग
त्याच काव्यात स्वतःला पाहून
वेडी ती पण लाजली मग
       हेच लाजणे आता याला
       आयुष्यभर पुरणार
       मनचं फितूर झाले
       त्याला कोण काय करणार…।।२।।

रेंगू लागला चहा संध्येचा
गप्पानाही कारण नाही
कॅन्टीन चे टेबल सुद्धा
आमची भेट चोरून पाही
       याच भेटी आता आपल्या
       रोज रोज घडणार
       मनचं फितूर झाले
       त्याला कोण काय करणार…।।३।।

रोज परतीची वाट  निराळी
दोघांना पण चैनच नाही
५ मिनिट म्हणता-म्हणता
१० लोकल निघूनही जाई
       दुरावा आपला लांबवण्या साठी
       रोजच असा ऊशीर करणार
       मनचं फितूर झाले
       त्याला कोण काय करणार…।।४।।

ठरलं होत प्रेमचं नाही
तरी हे मन पळणार
चोरून छुपून तुला पाहुनी
कविता नवी करणार
       रोज आपल्या भेटीचे हे
       नवे स्वप्न बघणार
       मनचं फितूर झाले
       त्याला कोण काय करणार…।।५।।

मनचं फितूर झाले
त्याला कोण काय करणार…

-प्रशांत भोपळे
(Date: १५/१०/२०१५)

थट्टा

आज म्हणाली "प्रेम तुझं
कधी-कधी कळत नाही
इतका सारं असून सुद्धा
डोळ्यात तुझ्या दिसत नाही"…. ।।

आता शांत बसू की
समजावून सांगू हिला ?
मिठीत घेऊन कसं
जाणवून देवू हिला ?
       "सख्या तुझ्या मिठीत आले
       तर मला काही सुचत नाही
       इतका सारं असून सुद्धा
       डोळ्यात तुझ्या दिसत नाही"…. ।।१।।

वेडे माझ्या डोळ्यामध्ये
तुझ्यासाठी जग आहे
त्याच्या भविष्याचे स्वप्नांचे
माझ्या डोळ्यात नभं आहे
       "सख्या आपल्या भविष्याचे
       मला काही तग नाही पण
       इतका सारं असून सुद्धा
       डोळ्यात तुझ्या दिसत नाही"…. ।।२।।

ठेव हात हृदयावरी
धडधड तुझ्या नावाची
काळजाची सगळी जागा
आहे तुझ्या गावाची
       "सख्या तुझ्या  हृदयाची
       मला धडधड कळत  नाही
       इतका सारं असून पण
       डोळ्यात कारे दिसत नाही"…. ।।३।।

बघ माझ्या रक्तात कसे
तुझे प्रेम घुमत आहे
नाडीचा प्रत्तेक ठोका
फक्त राधा-राधा म्हणत आहे
       "खरंच सांग सख्या मला
       राधा तुझी मीच नाही
       इतका सारं असून सुद्धा
       डोळ्यात तुझ्या दिसत नाही…. ।।४।।

ऐकुणी तिची व्यथा आता
४ थेंब डोळ्यात आले
पाहून आता सागर हा
तिचे संयम पुरते ढळाले
       हसू लागली डोळे पाणावून
       मिठीत येवून पुन्हा राही
       "इतका सारं असून सुद्धा
       डोळ्यात तुझ्या दिसत नाही"…. ।।५।।

"माफ़ कर सख्या मला
थट्टा हि खोटी होती
हृदयात आणि रक्तात तुझ्या
ओढ फक्त माझी होती
       तुझ्या डोळ्यात माझ्याशिवाय
       दुसरं कोणीच दिसत नाही
       इतका सर असून वेड्या
       डोळ्यात तुझ्या मीच राही … ।।६।।

इतका सर असून वेड्या
डोळ्यात तुझ्या मीच राही …

-प्रशांत भोपळे
(Date: १४/१०/२०१५)

गुरुवार, १५ ऑक्टोबर, २०१५

नक्कीच मग ती रुसून बसेल

आज पुन्हा उशिर झाला
तिला भेटायला जायला
नक्कीच मग ती रुसून बसेल
पुन्हा अबोला धरायला…. ।।

आजच का घड्याळ माझं
जोर-जोरात पळतं आहे
वेळ झालाय माहीत असून
मला ते चिडवतं आहे
       मग माझंच घड्याळ मला  दाखवून
       "कित्ती उशीर ?" म्हणायला
       नक्कीच मग ती रुसून बसेल
       पुन्हा अबोला धरायला…. ।।१।।

आज काम खूप होते
काय तिला सांगू
नवीन Project हाती यावा
Boss चा हट्ट सांगू
       "Boss च तुझा सगळ काही"
       असं म्हणून टोचायला
       नक्कीच मग ती रुसून बसेल
       पुन्हा अबोला धरायला…. ।।२।।

फुल एखादे न्यावे का ?
कि गजरा केसी माळायला
काय करावे सुचत नाही
रुसवा तिचा काढायला
       "नको मला फुलं तुझे"
       म्हणून परत करायला
       नक्कीच मग ती रुसून बसेल
       पुन्हा अबोला धरायला…. ।।३।।

Time -Management जमत नाही
कसं तिला सांगेन मी
वेळ माझा मित्रच नाही
कसं पटवून देईन मी
        "माझ्यासाठी वेळच नाही"
       असं म्हणून रडायला
       नक्कीच मग ती रुसून बसेल
       पुन्हा अबोला धरायला…. ।।४।।

इतका विचार करत असता
स्टेशन आपले आले
बाकड्यावरती बसलेल्या
त्या राधेला मी पाहीले
       माझा चेहरा पाहून मग ती
       कळी लागली फुलायला
       नक्कीच पण ती रुसून बसेल
       पुन्हा अबोला धरायला…. ।।५।।

कविता एखादी ऐकवू
की गाणं छान म्हणू
माझ्या फुलपाखराला त्या
मी कसे कुशित घेवू
       पण जवळ जाता मिठीत
       पाऊस होवून भिजायला
       नव्हती रुसून बसली पण ती
       मिठीत माझ्या शिरायला……।।६।।

नव्हती रुसून बसली पण ती
मिठीत माझ्या शिरायला ….

-प्रशांत भोपळे
(Date: १३/१०/२०१५)

मंगळवार, १३ ऑक्टोबर, २०१५

कसं सांगू ....

कधी काढून कंळ तुझी
थट्टा तुझी करतो
कसं सांगू तुला मी
प्रेम तुझ्यावर करतो…।।

कधी उगा चिडवून तुला
राग तुझा बनतो
कधी तुला रुसवायला
रोज ऊशीर करतो
       मग तोच रुसवा काढण्यासाठी
       मर-मर मरतो
       कसं सांगू तुला मी
       प्रेम कसं  करतो…।।१।।

कधी घेवून गजरा ओल्या
केसात तुझ्या माळतो
कधि करून छेड-छानी
केस मोकळे करतो
       बांधता तू वेणी पुन्हा
       गुंतून मीही बसतो
       कसं सांगू तुला मी
       प्रेम केव्हा करतो…।।२।।

तू शांत बसलीस की
बोलकं तुला करतो
अन बोलक्या त्या चेहऱ्याकडे
टक लावून बघतो
       काय बोललीस…कुणास ठावे
       फक्त ऐकत बसतो
       कसं सांगू कधी कसं
       तुझ्यावरती मरतो …।।३।।

अश्रु तुझे पाहताक्षणी
मीही थबकून जातो
मग तुला हसवण्यासी
लाखो कष्ट करतो
       कसें सांगु प्रत्तेक क्षण तो
       मनभरून जगतो
       कसं सांगू तुला आता
       किती प्रेम करतो …।।४।।

हाती घेवून हात तुझा
जेव्हा आपण चालतो
थांबून जावं क्षणांनी या
देवयाचीका करतो
       तुझ्या संगे म्हातारपणीचे
       स्वप्न तेव्हा मागतो
       काय सांगु केव्हापरी
       प्रेम  तुझ्यावर करतो…।।५।।

समजून घे आतातरी
डावं हा मांडलेला
जिंकवून तुला तुझ्यासाठी
सखा तुझा हरलेला
       हाच डाव तुझ्यासाठी
       रोज-रोज खेळतो
       कसं सांगू तुझ्यावरती
       किती प्रेम करतो….।।६।।

कसं सांगू तुझ्यावरती
किती प्रेम करतो….

-प्रशांत भोपळे
(Date:१२/१०/२०१५)

तुझी मिठी

हव्या-हव्याश्या मिठीमध्ये
घर करून बसलेले
ते क्षण अजून माझ्या
मनामध्ये साठलेले…।।

तुझी मिठी पावसासारखी
चिंब मला भिजवणारी
तुझी मिठी चांदण्यासारखी
स्वपनात मला रमवणारी
       त्या मिठीच्या ओलाव्याने
       शहारे अंगी दाठलेले
       ते क्षण अजून माझ्या
       मनामध्ये साठलेले…।।१।।

कधि आठवे पहाट ओली
धुक्यासंगे रमणारी
तुझी मिठी दवबिंदु
कमळावर या दंगणारी
       याच कमळाचे ऊर आज
       तुझ्यासाठी भरलेले
       ते क्षण अजून माझ्या
       मनामध्ये साठलेले…।।२।।

हवी-हवीशी मिठी तुझी
आधार मला देणारी
दुःख माझ्या जन्माचे
पिऊन स्वतः टाकणारी
       याच दुःखाचे पूर आज
       किनाऱ्यावर आटलेले
       ते क्षण अजून माझ्या
       मनामध्ये साठलेले…।।३।।

येवूदे मिठीठ पुन्हा
भान थोडे हरपुदे
वादळ जरी उठले तरी
सागरी मला उतरु दे
       किनाऱ्यावर होडी जणू
       माझं मन सुटलेले
       ते क्षण अजून माझ्या
       मनामध्ये साठलेले…।।४।।

ते क्षण अजून माझ्या
मनामध्ये साठलेले…

-प्रशांत भोपळे
(Date: ११/१०/२०१५)

तू रुसून बसलीस की

तुझं हास्य बघितलं की
मनाचं या सोनं होत
तू रुसून बसलीस की
जग माझं सूनं होत…… ।।

तुझा राग शेंड्यावरचा
लाल-लाल झालेला
माझ्या मनी चटक्या सारखा
ऊन होऊन पोळलेला
       असा राग बघितला की
       आभाळ माझं भरून येतं
       तू रुसून बसलीस की
       जग माझं सूनं होत…… ।।१।।

काहीतरी बोल
काही ईशारा दे तू मला
राग तुझा लटका आहे
कळूदे की मला
       त्या एका इशाऱ्यासाठी
       माझं मन अधिर होतं
       तू रुसून बसलीस की
       जग माझं सूनं होत…… ।।२।।

केसं मोकळे करून
थोडे प्रेम देईन  तुला
ये जवळ थोडीशी
मिठीत घेईन तुला
       याचं मिठीत तुझ्यासाठी
       खूप प्रेम दडलं होत
       तू रुसून बसलीस की
       जग माझं सूनं होत…… ।।३।।

सोड लटका राग तुझा
मिठीत येई जरा
माझ्यामधली राधा होवून
हरवून दे तू तुला
       याच रुसव्या राधेवरती
       माझं प्रेम जडलं होतं
       पण तू रुसून बसलीस की
       जग माझं सूनं होत…… ।।४।।

अन तू रुसून बसलीस की
जग माझं सूनं होत……

-प्रशांत भोपळे
(Date:१०/१०/२०१५)

सोमवार, १२ ऑक्टोबर, २०१५

लपून-छपून

जगापासून लपून-छपून
आपण प्रेम करायचे
वेड पांघरून प्रेमाचे या
आपण असेच जगायचे…. ।।

कळू नये कोणाला म्हणून
डोळ्यांनी या बोलायचे
इशार्याच्या भाषेनच गं
लपून-छपून भेटायचे
       त्याच इशाऱ्या  बोलून काही
       प्रेम व्यक्त करायचे
       वेड पांघरून प्रेमाचे या
       आपण असेच जगायचे…. ।।१।।

भेटीसाठी बागेमध्ये
रोज फुलं मोजायचं
कॉफीसाठी हाक देवून
दिवस मावळी बसायचं
       फुल-कॉफी नादामध्ये
       आपण रोज रमायचं
       वेड पांघरून प्रेमाचे या
       आपण असेच जगायचे…. ।।२।।

कॉलेज संपवून रोज
तुला घरी सोडाय निघायचं
चालता-चालता हात तुझा
हाती चोरून धरायचं
       कापऱ्या तुझ्या हाताने मग
       हात झटकून लाजायचं
       वेड पांघरून प्रेमाचे या
       आपण असेच जगायचे…. ।।३।।

दारि तुझ्या पोचता-पोचता
हळू-हळू चालायचं
गेट खोलून जाता-जाता
वळून तुही बघायचं
       इशाऱ्यानेच तू मला
       "जा की लवकर " म्हणायचं
       वेड पांघरून प्रेमाचे या
       आपण असेच जगायचे…. ।।४।।

उद्याच्या भेटीसाठी मग
नवीन स्वप्न पाहायचे
सुट्टी मधे आली तर मग
सरकार वरती चिडायचं
       पुढच्या नव्या भेटीसाठी
       उगाच रातभर तडपायचं
       वेड पांघरून प्रेमाचे या
       आपण असेच जगायचे…. ।।५।।


वेड पांघरून प्रेमाचे या
आपण असेच जगायचे….
लपून-छपून आपण असं
रोज प्रेम करायचं….

       लपून-छपून आपण असं
       रोज प्रेम करायचं….

-प्रशांत भोपळे
(Date: ९/१०/२०१५)

ती म्हणाली प्रेम म्हणजे नेमका कोणता गावं ?

ती म्हणाली प्रेम म्हणजे
नेमका कोणता गावं  आहे ?
मी म्हणालो प्रेम म्हणजे
फक्त तुझे नाव आहे…।

प्रेम म्हणजे मिळालेली
फक्त तुझी साथ
माझ्यासाठी नाही कोणती
दुसरी असली बात
       तुझी साथ हृदयासाठी
       रक्ताची ग धाव आहे
       प्रेम म्हणजे माझ्यासाठी
       फक्त तुझे नाव आहे… ।।१।।

का रे वेड्या माझ्यावरती
इतका प्रेम करतोस
आठवण माझी काढून तू
इतका का रे झुरतोस
       आठवणीत तुझ्या प्रिये
       माझ्यामधला मी आहे
       प्रेम म्हणजे माझ्यासाठी
       फक्त तुझे नाव आहे....||२।।

मग म्हणे दूर मी
अंतर सुद्धा  खूप आहे
साथ तुला देण्यासाठी
माझे मन भित आहे
       भिती  सोडून ये ग सखे
       विश्वास जर सख्यात आहे
       प्रेम म्हणजे माझ्यासाठी
       फक्त तुझे नाव आहे….।।३।।

डोळे मिटून पाहते मी तर
तुझी प्रतिमा त्यात आहे
माझ्यासाठी प्रेम म्हणजे
दुसरेच कोणी गाव आहे
       ये ग सखे धाव घेवूनी
       तुझच हे गाव आहे
       माझ्यासाठी प्रेम म्हणजे
       फक्त तुझे नाव आहे….।।४।।

लढून साऱ्या जगाशी
मला यावेसे वाटते रे
कर्तव्याची बेडी  पण ही
माझी वात रोखते रे
       ये ग  सखे तोडूनी बेड्या
       प्रेमाचा हा डाव  आहे
       माझ्यासाठी प्रेम म्हणजे
       फक्त तुझे नाव आहे….।।५।।

माझ्यासाठी प्रेम म्हणजे
       फक्त तुझे नाव आहे….


 -प्रशांत भोपळे
(Date: ८/१०/२०१५) 

पहिलं प्रेम

प्रत्तेक भेटीत नव्याने हे
तुझ्यासंगे घडलेलं
पहिलं  प्रेम दरवेळी
तुझ्यावरती जडलेलं……

तुझी चाहूल मनाला या
नव्याने हो लागली
भेट आपली पहिली पहिली
नव्याने ती घडली
       आपल्या प्रेमाचं गुपित जणू
       त्याच भेटीत दडलेला
        पहिलं  प्रेम दरवेळी
       तुझ्यावरती जडलेलं…… ।।१।।

तुझी अदा नाजूक परि
रंग तुझे निराळे
निरनिराळ्या रंगामध्ये
मन तुझे शहाळे
       त्याच मृदू मनामध्ये
       आपलं प्रेम दडलेलं
       पहिलं  प्रेम दरवेळी
       तुझ्यावरती जडलेलं…… ।।२।।

स्वप्न तुझे नवे
आभास तुझा नवा
तू नसताना होतो नेहमी
ध्यास तुझा नवा
       त्या भासा मध्ये तुझी
       चाहूल घेवून नटलेलं
       पहिलं  प्रेम दरवेळी
       तुझ्यावरती जडलेलं…… ।।३।।

चांद राती जेव्हा तुझी
आठवणं मनी मनी येते
चंद्र बनून नभाचा ती
भेट तुझी होते
       त्या भेटीच्या चांदण्यात मन माझ
       चकोर बनून भिजलेलं
       पहिलं  प्रेम दरवेळी
       तुझ्यावरती जडलेलं…… ।।४।।

पहिलं  प्रेम दरवेळी
तुझ्यावरती जडलेलं…… ।

-प्रशांत भोपळे
(Date: ७/१०/२०१५)  

बुधवार, ७ ऑक्टोबर, २०१५

तुझा लटका राग....!

तुझे गहीरे डोळे
तुझी नाजूक अदा
लटक्या तुझ्या रागाची
एक वेगळीच आहे अदा…॥

रुसवा तुझा प्रिये जणू
चंद्र नभी लपावा
चकोर बनून चांदण्यासाठी
हा वेडा तडपावा
      त्या रुसव्या चंद्राच्या मी
      चांदण्यात भिजू सदा
      लटक्या तुझ्या रागाची
      एक वेगळीच आहे अदा…॥१।।

तुझा अबोल वणवा जणू
उरी माझ्या पेटावा
त्या आगी तडपून तुझ्या
शब्दांसाठी तरसावा
      पण रुसवा काढून तुझा
      हा अबोला तोडीन सदा
      लटक्या तुझ्या रागाची
      एक वेगळीच आहे अदा…॥ २।।

अंतर तुझे सांज-सोयरे
अथांग सागर आज दाठला
दोण किनाऱ्या दूर लोटीरे
तडपडणाऱ्या त्याच प्रितीचा
      पार करुनी मी सागरी
      तुजसव येयील सदा
      लटक्या तुझ्या रागाची
      एक वेगळीच आहे अदा…॥ ३।।


सहन ना होई
तुला दाह हा
मग कसली आहे
शंका…
      धाव घालूनी तोडूनी अंतर
      मिठीत येई सदा
      लटक्या तुझ्या रागाची
      एक वेगळीच आहे अदा…॥४।।

अन लटक्या तुझ्या रागाची
एक वेगळीच आहे अदा………

--प्रशांत भोपळे
(Date: ६/१०/२०१५)

कृष्णाला या भेटून जा

माझ्यामधल्या राधेला तू
माझ्याजवळ सोडून जा
हा अबोल जीव घेतो
कृष्णाला या भेटून जा…।।

बघ पावूस उनाड वार
माझी खोड काढून जातो
भिजवून मला एकट्याला तो
श्रावणसरी वाहून जातो
      त्या उनाड पावसाला तू
      थोडा धडा शिकवून जा
       हा अबोल जीव घेतो
      कृष्णाला या भेटून जा…।।१।।

आली पहा ऊन  साजिरी
तुझी इर्षा करण्यासाठी
रूप गोजिरे सोनेरी ते
तुझी स्पर्धा करण्यासाठी
      त्या सांज किरणांना तू
      तुझी अदा दाखवून जा
      हा अबोल जीव घेतो
      कृष्णाला या भेटून जा…।।२।।

आता या सागराला पण
नवीन अदा येत आहे
नक्कल करून हास्य तुझे
माझे प्राण घेत आहे
      खळखळणाऱ्या किणाऱ्यावर
      साद एक देवून जा
      हा अबोल जीव घेतो
      कृष्णाला या भेटून जा…।।३।।

कोणा  सांगू काय करावे
दर्पण डोळे भरत आहे
माझ्या मधल्या प्रतिमेमध्ये
राधा मला दाखवत आहे
      वेगळी होवून माझ्यापासून
      पुन्हा माझी होवून जा
      हा अबोल जीव घेतो
      कृष्णाला या भेटून जा…।।४।।

हा अबोल जीव घेतो
कृष्णाला या भेटून जा……

--प्रशांत भोपळे
(Date:५/१०/२०१५)

गुरुवार, १ ऑक्टोबर, २०१५

पुन्हा कधी भेटायचे

नेहमी वाचावेसे वाटणारे तुझे डोळे
पुन्हा कधी वाचायचे….
सांग प्रिये तू सांग प्रिये
पुन्हा कधी भेटायचे…!

पहिल्यांदा तू भेटलीस तेव्हा
डोळे तुझे बोलत होते
या वेड्या बावळत मुला संगे
कसे सारखे बोलायचे
      त्या वेदावल्या डोळ्यांमध्ये
      पुन्हा कधी नाचायचे
      सांग प्रिये तू सांग प्रिये
      पुन्हा कधी भेटायचे ….॥१।।

कधी रागाने कधी रुसव्याने
तू माझ्याशी भांडतीस
सांगतात तुझे डोळे
तू फक्त माझ्यावर मरतीस
      त्या रुसलेल्या डोळ्यांना मी
      पुन्हा कधी मानावयाचे
      सांग प्रिये तू सांग प्रिये
      पुन्हा कधी भेटायचे ….॥२।।

भेट आपली पूर्ण होते
आणि तू निघून जातीस
जाता जाता नजरेत माझ्या
बघून तू निघून जातीस
      त्या पाणावल्या डोळ्यांमध्ये
      पुन्हा कधी भिजायचे
      सांग प्रिये तू सांग प्रिये
      पुन्हा कधी भेटायचे ….॥३।।


      सांग प्रिये तू सांग प्रिये
      पुन्हा कधी भेटायचे ….….

-प्रशांत भोपळे
(date: दररोज)

(Tag  : Romantic Marathi Poem Poems Sad Happy Love Girlfriend Boyfriend Radha  Krishna)