मंगळवार, १३ ऑक्टोबर, २०१५

तुझी मिठी

हव्या-हव्याश्या मिठीमध्ये
घर करून बसलेले
ते क्षण अजून माझ्या
मनामध्ये साठलेले…।।

तुझी मिठी पावसासारखी
चिंब मला भिजवणारी
तुझी मिठी चांदण्यासारखी
स्वपनात मला रमवणारी
       त्या मिठीच्या ओलाव्याने
       शहारे अंगी दाठलेले
       ते क्षण अजून माझ्या
       मनामध्ये साठलेले…।।१।।

कधि आठवे पहाट ओली
धुक्यासंगे रमणारी
तुझी मिठी दवबिंदु
कमळावर या दंगणारी
       याच कमळाचे ऊर आज
       तुझ्यासाठी भरलेले
       ते क्षण अजून माझ्या
       मनामध्ये साठलेले…।।२।।

हवी-हवीशी मिठी तुझी
आधार मला देणारी
दुःख माझ्या जन्माचे
पिऊन स्वतः टाकणारी
       याच दुःखाचे पूर आज
       किनाऱ्यावर आटलेले
       ते क्षण अजून माझ्या
       मनामध्ये साठलेले…।।३।।

येवूदे मिठीठ पुन्हा
भान थोडे हरपुदे
वादळ जरी उठले तरी
सागरी मला उतरु दे
       किनाऱ्यावर होडी जणू
       माझं मन सुटलेले
       ते क्षण अजून माझ्या
       मनामध्ये साठलेले…।।४।।

ते क्षण अजून माझ्या
मनामध्ये साठलेले…

-प्रशांत भोपळे
(Date: ११/१०/२०१५)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा