शुक्रवार, २३ ऑक्टोबर, २०१५

कृष्ण-बावरी

आरसा समोर घेवून जसा
स्वतःला माझ्यात बघते
तुझ्यामध्ये राधा मला
नेहमीच अशी दिसते……।।

हट्ट  कधी करते
कधी बालीश ती पण होते
भांडण करून माझ्याशी  कधी
रुसून मग ती बसते
       हाक ऐकूण बासरीची
       मग लगेच धावून येते
       तुझ्यामध्ये राधा मला
       नेहमीच अशी दिसते……।।१।।

दूर उभी धुंदीत माझ्या
भान हरपून जाते
उगाच लपून छपून कधी
माझे मन बघते
       धडधड होऊन काळजाची त्या
       मिठीत येवू बघते
       तुझ्यामध्ये राधा मला
       नेहमीच अशी दिसते……।।२।।


कधी बनते माय माझी
कधी प्रियेसी बनते
कधी हवून सख्या सारखा
कान माझे पिळते
सगळ्याच नात्यांची गोडी मला
एकाच नात्यात देते
       तुझ्यामध्ये राधा मला
       नेहमीच अशी दिसते……।।३।।

कधी होवुनी वादळ वारे
मनात माझ्या येते
कधी होवुनी सरी प्रितीची
मलाच भिजवून हसते
       त्या प्रितीच्या रंगामध्ये
       स्वतः रंगून जगते
       तुझ्यामध्ये राधा मला
       नेहमीच अशी दिसते……।।४।।

धाव घेवूनी माझ्यासाठी
बंधन तोडूनी येते
जरी दुरावा सात जन्मीचा
माझी होवून जाते
       माझी होवून जाता-जाता
       कृष्ण बावरी बनते
       तुझ्यामध्ये राधा मला
       नेहमीच अशी दिसते……।।५।।
तुझ्यामध्ये राधा मला
नेहमीच अशी दिसते……

-प्रशांत भोपळे
(Date:२०/१०/२०१५)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा