सोमवार, १२ ऑक्टोबर, २०१५

लपून-छपून

जगापासून लपून-छपून
आपण प्रेम करायचे
वेड पांघरून प्रेमाचे या
आपण असेच जगायचे…. ।।

कळू नये कोणाला म्हणून
डोळ्यांनी या बोलायचे
इशार्याच्या भाषेनच गं
लपून-छपून भेटायचे
       त्याच इशाऱ्या  बोलून काही
       प्रेम व्यक्त करायचे
       वेड पांघरून प्रेमाचे या
       आपण असेच जगायचे…. ।।१।।

भेटीसाठी बागेमध्ये
रोज फुलं मोजायचं
कॉफीसाठी हाक देवून
दिवस मावळी बसायचं
       फुल-कॉफी नादामध्ये
       आपण रोज रमायचं
       वेड पांघरून प्रेमाचे या
       आपण असेच जगायचे…. ।।२।।

कॉलेज संपवून रोज
तुला घरी सोडाय निघायचं
चालता-चालता हात तुझा
हाती चोरून धरायचं
       कापऱ्या तुझ्या हाताने मग
       हात झटकून लाजायचं
       वेड पांघरून प्रेमाचे या
       आपण असेच जगायचे…. ।।३।।

दारि तुझ्या पोचता-पोचता
हळू-हळू चालायचं
गेट खोलून जाता-जाता
वळून तुही बघायचं
       इशाऱ्यानेच तू मला
       "जा की लवकर " म्हणायचं
       वेड पांघरून प्रेमाचे या
       आपण असेच जगायचे…. ।।४।।

उद्याच्या भेटीसाठी मग
नवीन स्वप्न पाहायचे
सुट्टी मधे आली तर मग
सरकार वरती चिडायचं
       पुढच्या नव्या भेटीसाठी
       उगाच रातभर तडपायचं
       वेड पांघरून प्रेमाचे या
       आपण असेच जगायचे…. ।।५।।


वेड पांघरून प्रेमाचे या
आपण असेच जगायचे….
लपून-छपून आपण असं
रोज प्रेम करायचं….

       लपून-छपून आपण असं
       रोज प्रेम करायचं….

-प्रशांत भोपळे
(Date: ९/१०/२०१५)

1 टिप्पणी: