शनिवार, १७ ऑक्टोबर, २०१५

मनचं फितूर झाले

ठरवले होते आपण कधी
प्रेम नाही करणार
मनचं फितूर झाले
त्याला कोण काय करणार…।।

ओळख तिची नवी-नवी
ध्यास तिचा नवा होता
डोळ्यांमध्ये तिच्या जणू
आभास कोणी नवा होता
       त्याच डोळ्यामध्ये आता
       पूर्ण आयुष्य जगणार
       मनचं फितूर झाले
       त्याला कोण काय करणार…।।१।।

कविता एखादी नवी-नवी
तिच्यावरती सुचली मग
त्याच काव्यात स्वतःला पाहून
वेडी ती पण लाजली मग
       हेच लाजणे आता याला
       आयुष्यभर पुरणार
       मनचं फितूर झाले
       त्याला कोण काय करणार…।।२।।

रेंगू लागला चहा संध्येचा
गप्पानाही कारण नाही
कॅन्टीन चे टेबल सुद्धा
आमची भेट चोरून पाही
       याच भेटी आता आपल्या
       रोज रोज घडणार
       मनचं फितूर झाले
       त्याला कोण काय करणार…।।३।।

रोज परतीची वाट  निराळी
दोघांना पण चैनच नाही
५ मिनिट म्हणता-म्हणता
१० लोकल निघूनही जाई
       दुरावा आपला लांबवण्या साठी
       रोजच असा ऊशीर करणार
       मनचं फितूर झाले
       त्याला कोण काय करणार…।।४।।

ठरलं होत प्रेमचं नाही
तरी हे मन पळणार
चोरून छुपून तुला पाहुनी
कविता नवी करणार
       रोज आपल्या भेटीचे हे
       नवे स्वप्न बघणार
       मनचं फितूर झाले
       त्याला कोण काय करणार…।।५।।

मनचं फितूर झाले
त्याला कोण काय करणार…

-प्रशांत भोपळे
(Date: १५/१०/२०१५)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा