शनिवार, १७ ऑक्टोबर, २०१५

थट्टा

आज म्हणाली "प्रेम तुझं
कधी-कधी कळत नाही
इतका सारं असून सुद्धा
डोळ्यात तुझ्या दिसत नाही"…. ।।

आता शांत बसू की
समजावून सांगू हिला ?
मिठीत घेऊन कसं
जाणवून देवू हिला ?
       "सख्या तुझ्या मिठीत आले
       तर मला काही सुचत नाही
       इतका सारं असून सुद्धा
       डोळ्यात तुझ्या दिसत नाही"…. ।।१।।

वेडे माझ्या डोळ्यामध्ये
तुझ्यासाठी जग आहे
त्याच्या भविष्याचे स्वप्नांचे
माझ्या डोळ्यात नभं आहे
       "सख्या आपल्या भविष्याचे
       मला काही तग नाही पण
       इतका सारं असून सुद्धा
       डोळ्यात तुझ्या दिसत नाही"…. ।।२।।

ठेव हात हृदयावरी
धडधड तुझ्या नावाची
काळजाची सगळी जागा
आहे तुझ्या गावाची
       "सख्या तुझ्या  हृदयाची
       मला धडधड कळत  नाही
       इतका सारं असून पण
       डोळ्यात कारे दिसत नाही"…. ।।३।।

बघ माझ्या रक्तात कसे
तुझे प्रेम घुमत आहे
नाडीचा प्रत्तेक ठोका
फक्त राधा-राधा म्हणत आहे
       "खरंच सांग सख्या मला
       राधा तुझी मीच नाही
       इतका सारं असून सुद्धा
       डोळ्यात तुझ्या दिसत नाही…. ।।४।।

ऐकुणी तिची व्यथा आता
४ थेंब डोळ्यात आले
पाहून आता सागर हा
तिचे संयम पुरते ढळाले
       हसू लागली डोळे पाणावून
       मिठीत येवून पुन्हा राही
       "इतका सारं असून सुद्धा
       डोळ्यात तुझ्या दिसत नाही"…. ।।५।।

"माफ़ कर सख्या मला
थट्टा हि खोटी होती
हृदयात आणि रक्तात तुझ्या
ओढ फक्त माझी होती
       तुझ्या डोळ्यात माझ्याशिवाय
       दुसरं कोणीच दिसत नाही
       इतका सर असून वेड्या
       डोळ्यात तुझ्या मीच राही … ।।६।।

इतका सर असून वेड्या
डोळ्यात तुझ्या मीच राही …

-प्रशांत भोपळे
(Date: १४/१०/२०१५)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा