बुधवार, ७ ऑक्टोबर, २०१५

तुझा लटका राग....!

तुझे गहीरे डोळे
तुझी नाजूक अदा
लटक्या तुझ्या रागाची
एक वेगळीच आहे अदा…॥

रुसवा तुझा प्रिये जणू
चंद्र नभी लपावा
चकोर बनून चांदण्यासाठी
हा वेडा तडपावा
      त्या रुसव्या चंद्राच्या मी
      चांदण्यात भिजू सदा
      लटक्या तुझ्या रागाची
      एक वेगळीच आहे अदा…॥१।।

तुझा अबोल वणवा जणू
उरी माझ्या पेटावा
त्या आगी तडपून तुझ्या
शब्दांसाठी तरसावा
      पण रुसवा काढून तुझा
      हा अबोला तोडीन सदा
      लटक्या तुझ्या रागाची
      एक वेगळीच आहे अदा…॥ २।।

अंतर तुझे सांज-सोयरे
अथांग सागर आज दाठला
दोण किनाऱ्या दूर लोटीरे
तडपडणाऱ्या त्याच प्रितीचा
      पार करुनी मी सागरी
      तुजसव येयील सदा
      लटक्या तुझ्या रागाची
      एक वेगळीच आहे अदा…॥ ३।।


सहन ना होई
तुला दाह हा
मग कसली आहे
शंका…
      धाव घालूनी तोडूनी अंतर
      मिठीत येई सदा
      लटक्या तुझ्या रागाची
      एक वेगळीच आहे अदा…॥४।।

अन लटक्या तुझ्या रागाची
एक वेगळीच आहे अदा………

--प्रशांत भोपळे
(Date: ६/१०/२०१५)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा