बुधवार, ७ ऑक्टोबर, २०१५

कृष्णाला या भेटून जा

माझ्यामधल्या राधेला तू
माझ्याजवळ सोडून जा
हा अबोल जीव घेतो
कृष्णाला या भेटून जा…।।

बघ पावूस उनाड वार
माझी खोड काढून जातो
भिजवून मला एकट्याला तो
श्रावणसरी वाहून जातो
      त्या उनाड पावसाला तू
      थोडा धडा शिकवून जा
       हा अबोल जीव घेतो
      कृष्णाला या भेटून जा…।।१।।

आली पहा ऊन  साजिरी
तुझी इर्षा करण्यासाठी
रूप गोजिरे सोनेरी ते
तुझी स्पर्धा करण्यासाठी
      त्या सांज किरणांना तू
      तुझी अदा दाखवून जा
      हा अबोल जीव घेतो
      कृष्णाला या भेटून जा…।।२।।

आता या सागराला पण
नवीन अदा येत आहे
नक्कल करून हास्य तुझे
माझे प्राण घेत आहे
      खळखळणाऱ्या किणाऱ्यावर
      साद एक देवून जा
      हा अबोल जीव घेतो
      कृष्णाला या भेटून जा…।।३।।

कोणा  सांगू काय करावे
दर्पण डोळे भरत आहे
माझ्या मधल्या प्रतिमेमध्ये
राधा मला दाखवत आहे
      वेगळी होवून माझ्यापासून
      पुन्हा माझी होवून जा
      हा अबोल जीव घेतो
      कृष्णाला या भेटून जा…।।४।।

हा अबोल जीव घेतो
कृष्णाला या भेटून जा……

--प्रशांत भोपळे
(Date:५/१०/२०१५)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा