मंगळवार, २० ऑक्टोबर, २०१५

कोण ही राधा ?

तुझं  नसणं असण्यासारखं
म्हणून कविता जमतात
पण
"कोण रे तुझी राधा ?"
असे सगळेच मला म्हणतात…।।

जग आहे इतका मोठा
डोळे माझे दोन
कसं सांगू सगळ्यांना
राधा… आहे तरी कोण
       त्या राधेच्या शोधामध्ये
       डोळे माझे दमतात
       "कोण रे तुझी राधा ?"
       असे सगळेच मला म्हणतात…।।१।।

प्रत्तेक मुलीमध्ये तिचा
शोध घेत आहे
रोज नव्या धुंदीमध्ये
कविता नवी  लिहीत आहे
       मग नेमकी राधा कोण आहे
       कवितेत माझ्या शोधतात
       "कोण रे तुझी राधा ?"
       असे पुन्हा मला म्हणतात…।।२।।

कोण जाणे मनात माझ्या
छबी तुझी काय आहे
मी वासरू तिचे
कधी तू माझी माय आहे
       तुझ्या कुशीमध्ये माझी
       सगळी स्वप्न रेंगतात
       "अरे कोण तुझी राधा ?"
       मग सगळेच मला म्हणतात…।।३।।

कोण समजू शकेल आता
राधा कुठे कोण आहे
आत्मा आमची एक जरी
शरीरं ही दोन आहे
       माझ्या प्राणामध्ये फक्त
       आभास तुझे रेंगतात
       "कोण बरे राधा ही ?"
       सगळेच मला म्हणतात…।।४।।

"कोण बरे राधा ही ?"
सगळेच मला म्हणतात…

-प्रशांत भोपळे
(Date:१६/१०/२०१५)
Tag: Marathi Kavita | Romantic Poem | Radha Krishna | Love

२ टिप्पण्या: