गुरुवार, १५ ऑक्टोबर, २०१५

नक्कीच मग ती रुसून बसेल

आज पुन्हा उशिर झाला
तिला भेटायला जायला
नक्कीच मग ती रुसून बसेल
पुन्हा अबोला धरायला…. ।।

आजच का घड्याळ माझं
जोर-जोरात पळतं आहे
वेळ झालाय माहीत असून
मला ते चिडवतं आहे
       मग माझंच घड्याळ मला  दाखवून
       "कित्ती उशीर ?" म्हणायला
       नक्कीच मग ती रुसून बसेल
       पुन्हा अबोला धरायला…. ।।१।।

आज काम खूप होते
काय तिला सांगू
नवीन Project हाती यावा
Boss चा हट्ट सांगू
       "Boss च तुझा सगळ काही"
       असं म्हणून टोचायला
       नक्कीच मग ती रुसून बसेल
       पुन्हा अबोला धरायला…. ।।२।।

फुल एखादे न्यावे का ?
कि गजरा केसी माळायला
काय करावे सुचत नाही
रुसवा तिचा काढायला
       "नको मला फुलं तुझे"
       म्हणून परत करायला
       नक्कीच मग ती रुसून बसेल
       पुन्हा अबोला धरायला…. ।।३।।

Time -Management जमत नाही
कसं तिला सांगेन मी
वेळ माझा मित्रच नाही
कसं पटवून देईन मी
        "माझ्यासाठी वेळच नाही"
       असं म्हणून रडायला
       नक्कीच मग ती रुसून बसेल
       पुन्हा अबोला धरायला…. ।।४।।

इतका विचार करत असता
स्टेशन आपले आले
बाकड्यावरती बसलेल्या
त्या राधेला मी पाहीले
       माझा चेहरा पाहून मग ती
       कळी लागली फुलायला
       नक्कीच पण ती रुसून बसेल
       पुन्हा अबोला धरायला…. ।।५।।

कविता एखादी ऐकवू
की गाणं छान म्हणू
माझ्या फुलपाखराला त्या
मी कसे कुशित घेवू
       पण जवळ जाता मिठीत
       पाऊस होवून भिजायला
       नव्हती रुसून बसली पण ती
       मिठीत माझ्या शिरायला……।।६।।

नव्हती रुसून बसली पण ती
मिठीत माझ्या शिरायला ….

-प्रशांत भोपळे
(Date: १३/१०/२०१५)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा