मंगळवार, १३ ऑक्टोबर, २०१५

तू रुसून बसलीस की

तुझं हास्य बघितलं की
मनाचं या सोनं होत
तू रुसून बसलीस की
जग माझं सूनं होत…… ।।

तुझा राग शेंड्यावरचा
लाल-लाल झालेला
माझ्या मनी चटक्या सारखा
ऊन होऊन पोळलेला
       असा राग बघितला की
       आभाळ माझं भरून येतं
       तू रुसून बसलीस की
       जग माझं सूनं होत…… ।।१।।

काहीतरी बोल
काही ईशारा दे तू मला
राग तुझा लटका आहे
कळूदे की मला
       त्या एका इशाऱ्यासाठी
       माझं मन अधिर होतं
       तू रुसून बसलीस की
       जग माझं सूनं होत…… ।।२।।

केसं मोकळे करून
थोडे प्रेम देईन  तुला
ये जवळ थोडीशी
मिठीत घेईन तुला
       याचं मिठीत तुझ्यासाठी
       खूप प्रेम दडलं होत
       तू रुसून बसलीस की
       जग माझं सूनं होत…… ।।३।।

सोड लटका राग तुझा
मिठीत येई जरा
माझ्यामधली राधा होवून
हरवून दे तू तुला
       याच रुसव्या राधेवरती
       माझं प्रेम जडलं होतं
       पण तू रुसून बसलीस की
       जग माझं सूनं होत…… ।।४।।

अन तू रुसून बसलीस की
जग माझं सूनं होत……

-प्रशांत भोपळे
(Date:१०/१०/२०१५)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा