शुक्रवार, ११ डिसेंबर, २०१५

न्हाहलेल्या तुझ्या केसांमध्ये

न्हाहलेल्या तुझ्या केसांमध्ये
गुंतून मी फसलो
त्या देखण्या रुपामध्ये
हरवून मी बसलो

चंद्राची तुझं उपमा देवू
की सुर्य तुझ्या गाली आहे
उधाणलेल्या लाटांसारखी
केसांची ती अदा आहे
       मुखचंद्राच्या चांदण्यामध्ये
       पुरता चातक बनलो
       न्हाहलेल्या तुझ्या केसांमध्ये
       गुंतून मी फसलो…….।।१।।

इंद्रधनूची उपमा देवू
की क्षितिजावरची संध्या आहे
केसांमध्ये तुझ्या सखे
जादुगरी अदा आहे
       इंद्रधनुच्या च्या रंगामध्ये
       पुरता रंगुन बसलो
       न्हाहलेल्या तुझ्या केसांमध्ये
       गुंतून मी फसलो…….।।२।।

त्यात बट एखादी
नागमोडी बनते
बांधून मला पाषामध्ये
प्रेमांत पड म्हणते
       हरवून मग स्वतःलाच मी
       तुझा होवून बसलो
       न्हाहलेल्या तुझ्या केसांमध्ये
       गुंतून मी फसलो…….।।३।।

-प्रशांत भोपळे
(Date:४/१२/२०१५)

Tag:Love |Romantic | Marathi Poem| Kavita | Radha |Krishna   

गुरुवार, ३ डिसेंबर, २०१५

कर ना एखादी कविता तू पण.....

कर ना एखादी कविता तू पण
प्रेम आहे सांगण्याकरिता
माझ्या वरच्या प्रेमाला तू
शब्दांमध्ये मांडण्याकरिता….….।।

घेशील कागद आठवणीं काढून
शब्द तुझे खेळतील
माझ्यावरच्या प्रेमापायी
यमक स्वतःच जुळतील
       यमक जुळवत थोडे-सोडे
       मीरा माझी बनण्याकरिता
       कर ना एखादी कविता तू पण
       प्रेम आहे सांगण्याकरिता….….।।१।।

अवघड असेल सखे थोडं
थोडं कठीण असेल
प्रेम तुझं इतका आहे
बघ कविता सुद्धा सुचेल
       याच प्रेमाचे अर्थ आज
       शब्दकोषात भरण्याकरिता
       कर ना एखादी कविता तू पण
       प्रेम आहे सांगण्याकरिता….….।।२।।

वाचून नुसतं हसू नको
आता तूही धाडस कर
खाडा-खोड का होयीना
कागद आज तू रखड़
       त्याच कागदावर माझं प्रेम
       चुर्घळलेला बघण्याकरिता
       कर ना एखादी कविता तू पण
       प्रेम आहे सांगण्याकरिता….….।।३।।

कर ना एखादी कविता तू पण
प्रेम आहे सांगण्याकरिता….….

-प्रशांत भोपळे
(Date:३/१२/२०१५)

Tag:Love |Romantic | Marathi Poem| Kavita | Radha |Krishna 

विचार तुझा....

सकाळी जाग येते सखे
विचार तुझा येतो
मुठीत घेवून त्याला मग मी
पुन्हा निजून जातो….….।।

त्या विचारांची मग मी
काय सांगू अदा
तुझं हास्य घेवून माझ्या
स्वप्नात येतो सदा
       स्वप्नात सुद्धा पुन्हा तुझ्यात
       हरवून मीही जातो
       मुठीठ घेवून विचार तुझा
       पुन्हा निजून जातो….….।।१।।

येतो अचानक call तुझा
मग जाग मला येते
तुझ्या मिठीच्या विचारांची
साखळी तुटून जाते
       "उशीर होईल पुन्हा भेटाया"
       हाच विचार म्हणतो
        मुठीठ घेवून विचार तुझा
       पुन्हा निजून जातो….….।।२।।

आता मात्र विचार तुझा
झोपू मला देत नाही
भेट तुझी होईपर्यंत
शांत हा बसत नाही
       भेट तुझी घेण्याकरता
       वेडा-पिसा होतो
       मुठीत घेवून विचार मग मी
       धावत पळत येतो….….।।३।।

रोज तुझी भेट होता
दिवस सुद्धा कमी पडतो
तुझ्या नजरेत पाहून मला
तेवढ्या पुरता शांत होतो
       तू निघून गेलीस की मग
       पुन्हा मला छळू पाहतो
       मुठीठ घेवून विचार तुझा
       पुन्हा मग मी निघून जातो….….।।४।।

मुठीठ घेवून विचार तुझा
पुन्हा मग मी निजून जातो….….

-प्रशांत भोपळे
(Date:३/१२/२०१५)

Tag:Love |Romantic | Marathi Poem| Kavita | Radha |Krishna