शुक्रवार, ११ डिसेंबर, २०१५

न्हाहलेल्या तुझ्या केसांमध्ये

न्हाहलेल्या तुझ्या केसांमध्ये
गुंतून मी फसलो
त्या देखण्या रुपामध्ये
हरवून मी बसलो

चंद्राची तुझं उपमा देवू
की सुर्य तुझ्या गाली आहे
उधाणलेल्या लाटांसारखी
केसांची ती अदा आहे
       मुखचंद्राच्या चांदण्यामध्ये
       पुरता चातक बनलो
       न्हाहलेल्या तुझ्या केसांमध्ये
       गुंतून मी फसलो…….।।१।।

इंद्रधनूची उपमा देवू
की क्षितिजावरची संध्या आहे
केसांमध्ये तुझ्या सखे
जादुगरी अदा आहे
       इंद्रधनुच्या च्या रंगामध्ये
       पुरता रंगुन बसलो
       न्हाहलेल्या तुझ्या केसांमध्ये
       गुंतून मी फसलो…….।।२।।

त्यात बट एखादी
नागमोडी बनते
बांधून मला पाषामध्ये
प्रेमांत पड म्हणते
       हरवून मग स्वतःलाच मी
       तुझा होवून बसलो
       न्हाहलेल्या तुझ्या केसांमध्ये
       गुंतून मी फसलो…….।।३।।

-प्रशांत भोपळे
(Date:४/१२/२०१५)

Tag:Love |Romantic | Marathi Poem| Kavita | Radha |Krishna   

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा