गुरुवार, ३ डिसेंबर, २०१५

विचार तुझा....

सकाळी जाग येते सखे
विचार तुझा येतो
मुठीत घेवून त्याला मग मी
पुन्हा निजून जातो….….।।

त्या विचारांची मग मी
काय सांगू अदा
तुझं हास्य घेवून माझ्या
स्वप्नात येतो सदा
       स्वप्नात सुद्धा पुन्हा तुझ्यात
       हरवून मीही जातो
       मुठीठ घेवून विचार तुझा
       पुन्हा निजून जातो….….।।१।।

येतो अचानक call तुझा
मग जाग मला येते
तुझ्या मिठीच्या विचारांची
साखळी तुटून जाते
       "उशीर होईल पुन्हा भेटाया"
       हाच विचार म्हणतो
        मुठीठ घेवून विचार तुझा
       पुन्हा निजून जातो….….।।२।।

आता मात्र विचार तुझा
झोपू मला देत नाही
भेट तुझी होईपर्यंत
शांत हा बसत नाही
       भेट तुझी घेण्याकरता
       वेडा-पिसा होतो
       मुठीत घेवून विचार मग मी
       धावत पळत येतो….….।।३।।

रोज तुझी भेट होता
दिवस सुद्धा कमी पडतो
तुझ्या नजरेत पाहून मला
तेवढ्या पुरता शांत होतो
       तू निघून गेलीस की मग
       पुन्हा मला छळू पाहतो
       मुठीठ घेवून विचार तुझा
       पुन्हा मग मी निघून जातो….….।।४।।

मुठीठ घेवून विचार तुझा
पुन्हा मग मी निजून जातो….….

-प्रशांत भोपळे
(Date:३/१२/२०१५)

Tag:Love |Romantic | Marathi Poem| Kavita | Radha |Krishna 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा